🚨 पुण्यात फिल्मी स्टाईलने तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजविणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 15, 2020

🚨 पुण्यात फिल्मी स्टाईलने तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजविणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद..


🚨 पुण्यात फिल्मी स्टाईलने तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजविणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद..

पुणे शहरात वाढदिवसाचा केक रस्यावरच कापण्याचे विकृत प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीत फिल्मी स्टाईलने वाढदिवसाचा तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजवित असल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भिती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

फिल्मी स्टाईलने तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजविणारा आरोपी
दिनेश हनमंता कांबळे (वय 20, रा. राजु गांधीनगर,अप्पर,बिबवेवाडी,पुणे) यास तलवारीसह ताब्यात घेत त्याचेवर बिबवेवाडी पोलीस ठाणेमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) सह 135 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अन्वेय प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

तलवारीने केक कापुन परिसरात दहशत माजविणाऱ्याला आरोपीच्या पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या..
मा. पोलीस उपआयुक्त परिमंडल 05 पुणे शहर श्री. सुहास बावचे यांनी दिलेल्या आदेशान्वये दि.14 मार्च 2020 रोजी रात्री 12:00 वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी,कर्मचारी व पोलीस ठाणेकडील स्टाफ असे बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन मध्ये गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस शिपाई श्री. स्मित चव्हाण यांना बातमी मिळाली की, राजीव गांधीनगर,अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे येथे अंगात पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला व डोक्यास केसाचा बुचडा बांधलेला एक इसम त्याचे वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन परिसरात दहशत करीत आहे अशी बातमी मिळताच हि बातमी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांना कळवुन त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजेश उसगांवकर , पोलीस शिपाई श्री. स्मित चव्हाण व पोलीस शिपाई श्री. मोरे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे त्याठिकाणी जावुन इसम दिनेश हनमंता कांबळे (वय 20, रा. राजु गांधीनगर,अप्पर,बिबवेवाडी,पुणे) यास तलवारीसह ताब्यात घेवुन त्यास बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे आणुन त्याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) सह 135 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अन्वेय प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी,
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजेश उसगांवकर , पोलीस शिपाई श्री. स्मित चव्हाण व पोलीस शिपाई श्री. मोरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages