😱 पुण्यात होळीच्या रंगात बे रंग; कोंढव्यात १० टक्के व्याजापायी मित्राचा खून..आरोपी काही तासातच अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 10, 2020

😱 पुण्यात होळीच्या रंगात बे रंग; कोंढव्यात १० टक्के व्याजापायी मित्राचा खून..आरोपी काही तासातच अटक..

😱 पुण्यात होळीच्या रंगात बे रंग; कोंढव्यात १० टक्के व्याजापायी मित्राचा खून..आरोपी काही तासातच अटक..

पुणे शहरात होळी या सणाच्या दिवसी १० टक्के व्याजाने दिलेले १५,०००/- रुपये माघारी देत नाही या कारणावरुन २४ वर्षीय तरुणास मारहाण करून ११ व्या मजल्यावरून ढकलुन देवुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवार दि.१० मार्च २०२० रोजी रात्री ०१.४५ ते ०३.१५ वाजण्याच्या दरम्यान कुल उत्सव सोसायटी, खडी मशीन चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे घडली आहे. याघटने प्रकरणी वॉचमनचे काम करणारे ओंकार चद्रंकात येणपुरे (वय २०, रा.सुखकर्ता निवास,कात्रज,पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

सागर चिलवेरी (वय 24, रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तरुणाचा खून केल्याप्रकरणी
१) अभिनव जाधव,
२) अक्षय गोरडे,
३) तेजस गुजर
या तीन आरोपीवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं व कलम २२९/२०२० भादवि कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ,
पुणे शहर कोंढवा परिसरात फिर्यादी ओंकार येणपुरे वॉचमनचे काम करीत असताना रात्री ०१.४५ ते ०३.१५ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या कामाच्या कार्यालयासमोरी कुल उत्सव सोसायटीत राहणारे इसम अभिनव जाधव, अक्षय गोरडे व तेजस गुजर यांनी त्यांच्यासोबत राहणारा सागर चिलवेरी यास १० टक्के व्याजाने दिलेले १५,०००/- रुपये माघारी देत नाही या कारणावरुन बाहेरून जबरदस्तीने मोटार सायकलवर कुल उत्सव सोसायटीतील राहत्या फ्लॅटमध्ये आणुन त्याला मारहाण करुन त्यास ११ व्या मजल्यावरुन ढकलुन देवुन त्याचा खून केला आहे. सागर चिलवेरी या तरुणाचा खून केल्याप्रकरणी आरोपी अभिनव जाधव, अक्षय गोरडे व तेजस गुजर यांच्याविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीनुसार गु.र.नं व कलम २२९/२०२० भादवि कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. महादेव कुंभार करत आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच,
मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५ पुणे शहर श्री. सुहास बावचे ,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. सुनील कलगूटकर ,
कोंढवा पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. विनायक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन तपासी अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना दिल्या .

Post Bottom Ad

#

Pages