📄 पुण्यात दोन वर्षापासून "मुख्य रस्तायाचे रखडलेले काम व पिण्याच्या पाणी प्रश्नी" उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उंड्री-पिसोळीचे समाजसेवक राजेंद्रशेठ भिंताडे यांनी दिले निवेदन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 11, 2020

📄 पुण्यात दोन वर्षापासून "मुख्य रस्तायाचे रखडलेले काम व पिण्याच्या पाणी प्रश्नी" उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उंड्री-पिसोळीचे समाजसेवक राजेंद्रशेठ भिंताडे यांनी दिले निवेदन..


📄 पुण्यात दोन वर्षापासून "मुख्य रस्तायाचे रखडलेले काम व पिण्याच्या पाणी प्रश्नी" उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उंड्री-पिसोळीचे समाजसेवक राजेंद्रशेठ भिंताडे यांनी दिले निवेदन..

पुणे शहरातील कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्र.२६ मध्ये साडेचार किलोमीटरची जलवाहिनी आणि श्री.गुरुनानक देवजी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हयाचे पालकमंत्री श्री.अजित दादा पवार यांना खडी मशिन चौक ते मंतरवाडी उरूळी देवाची पर्यंतच्या रस्तायाचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करावे तसेच उंड्री-पिसोळी गावातील मेथाकुठीस आलेल्या ग्रामस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लवण्याचे निवेदन समाजसेवक श्री.राजेंद्र शेठ भिंताडे व उंड्री-पिसोळी ग्रामस्थांनकडून देण्यात आले. यावेळी महापौर श्री.मुरलीधर मोहोळ, आमदार श्री.चेतन तुपे, नगरसेविका सौ.नंदा लोणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलतांना "नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासह विविध विकासकामांसाठी निधी देण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही,' असे आश्वासन
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी दिले आहे.


संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन..
पुणे शहर कोंढव्यातील उंड्री-पिसोळी या मुख्य रस्त्याचे काम दोन वर्षापासून संथ गतीने चालू आहे याबाबत उंड्री येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी पत्रव्यवहाराद्वारे विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता बनवण्यासाठी पुणे महापालिकेकडे फंड उपलब्ध नसल्याचे धक्कादायक कारण सांगिण्यात आले होते. दोन वर्षापासून संथ गतीने चालू असलेल्या कामामुळे व अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणाने हा रस्ता किती महिन्यांनी किंवा किती वर्षांनी पूर्णत्वास येईल किंवा नाही ? याभीतीने उंड्री-पिसोळी येथील ग्रामस्थांच्या वतीने धर्मावत पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.शेख यांना 25 जानेवारी 2020 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.शेख यांनी 15 दिवसाच्या आत मध्ये उंड्री-पिसोळी या मुख्य रस्त्याचे काम चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण झाल्यानंतर उंड्री ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत असल्याने उंड्रीकरांनी आक्रमक भुमिका घेत उपअभियंता श्री.सुनील अहिरे यांना पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याबाबत 12 फेब्रुवारी 2020 रोजी निवेदन देण्यात आले होते.


संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाला दाखवली केराची टोपली..
संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उंड्री-पिसोळी या मुख्य रस्त्याचे काम व उंड्री-पिसोळी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाणी प्रश्नी निवेदन देण्यात येऊन सुद्धा कोणतेही प्रश्न मार्गी न लावता संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाला सोईस्करपणे केराची टोपली दाखवल्याने मेथाकुठीस आलेल्या उंड्री-पिसोळी ग्रामस्थ व समाजसेवक श्री.राजेंद्र शेठ भिंताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हयाचे पालकमंत्री श्री.अजित दादा पवार यांना उंड्री-पिसोळी गावातील प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लवण्याकामी निवेदन देण्यात आले आहे.

समाजसेवक श्री.राजेंद्र शेठ भिंताडे यांनी सांगितले..
पुणे, सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व जड वाहतूक हडपसर-गाडीतळ-सासवड मार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावरून वळविल्याने या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. त्यात जास्त प्रमाणात जड वाहनांचा समावेश आहे. हा मार्ग हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्तीतून जात असल्याने इतर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन वाहतूक कोंडी होत आहे. दोन वर्षापासून खडी मशिन चौक ते मंतरवाडी उरूळी देवाची पर्यंतच्या रस्तायाचे रखडलेले काम संथ गतीने चालू असल्याने उंड्री-पिसोळी येथील ग्रामस्थ व नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच पुर्वी छोट्याशा असणाऱ्या उंड्री-पिसोळी गावचा विकास झपाट्याने वाढत असताना एक वर्षापूर्वी उंड्री-पिसोळी हे गाव पुणे महापालिकेत सामावून घेण्यात आले. आत्ताची लोकसंख्या पहाता पुणे महापालिकेच्या वतीने उंड्रीकरांना होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. ३ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या फक्त गावठाण भागात रोज सरासरी १० पाण्याचे टँकर पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहेत तर विकास होत असलेल्या भागात इमारतींमध्ये साधारण २० टँकर पुरविले जात आहेत. त्यामुळे सरासरी २५००० लोकसंख्या असलेल्या भागात पुरविले जाणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने उंड्री-पिसोळी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत आहे. उंड्री-पिसोळी ग्रामपंचायतील गावाचा विकास होत असतांना इमारतींना पाण्याच्या लाईन देण्यात आल्या असत्या तर पाणी पुरवठा जलद गतीने करणे सोपे झाले असते, असे समाजसेवक श्री.राजेंद्र शेठ भिंताडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages