🌾पुणे बाजार समिती प्रशासनाच्या रडारवर भाजीपाला विभागातील ४० आडते.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 5, 2020

🌾पुणे बाजार समिती प्रशासनाच्या रडारवर भाजीपाला विभागातील ४० आडते..


🌾 पुणे बाजार समिती प्रशासनाच्या रडारवर भाजीपाला विभागातील ४० आडते..

बाजार समितीमध्ये सेस चोरीसह शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीमधून बेकायदा पैसे लाटणाऱ्या चार डाळिंब आडत्यांनंतर आता बाजार समिती प्रशासनाच्या रडारवर भाजीपाला विभागातील ४० आडते आहेत. सध्या यांची दफ्तर तपासणी अंतिम टप्प्यात असून, या तपासणीमधून किती कोटींची लूट समोर येणार याकडे बाजार घटकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. नुकतेच चार डाळिंब आडत्यांवर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीमधून कोट्यवधी रुपयांची लुट केल्याचे समोर आले आहे. या चार आडत्यांकडून मुद्दल आणि दंडांची सुमारे ३० कोटी ५५ लाख रुपये भरण्याचे आदेश बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिले आहेत.

दरम्यान अशाच प्रकारे भाजीपाला विभागातील सुमारे ४० आडते बाजार समिती प्रशासनाच्या रडावर आहेत. या आडत्यांची दफ्तर तपासणी सुरू असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कोणत्या आडत्यांनी किती कोटींची लुट केली आहे. हे लवकरच समोर येणार आहे. शेतकरी संघटनांनी सातत्याने बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप विविध घटनांनी खरा असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.

आडत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी
दरम्यान डाळिंब उत्पादकांची फसवणूक केल्याप्रकरणी चार आडत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. एक वर्षांपूर्वी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देखील अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे आता तरी गुन्हे दाखल करावे. ही लुट केवळ दोन वर्षांतील असून, आणखी किती लुट शेतकऱ्यांची केली याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी ही मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages