‘चला हवा येऊ द्या’चे निलेश साबळे व झी वाहिनीला छत्रपती संभाजी राजे यांचा सजग इशारा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 14, 2020

‘चला हवा येऊ द्या’चे निलेश साबळे व झी वाहिनीला छत्रपती संभाजी राजे यांचा सजग इशारा..चला हवा येऊ द्या’चे निलेश साबळे व झी वाहिनीला छत्रपती संभाजी राजे यांचा सजग इशारा..

“लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो,” अशी टीका छत्रपती संभाजी राजे यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमवर केली आहे. तसंच निलेश साबळे आणि संबंधित वाहिनीनं गैरकृत्याची जबाबदारी स्वीकारून माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

छत्रपती संभाजी राजे यांचा निषेध व इशारा..
“लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे यांनी निषेध व्यक्त केला आहे. “निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी.अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले..
“आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही ते म्हणाले.

Post Bottom Ad

#

Pages