🔥उंड्रीत लाकडी सोफाशेट फर्निचरच्या गोदामाला भीषण आग.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 15, 2020

🔥उंड्रीत लाकडी सोफाशेट फर्निचरच्या गोदामाला भीषण आग..


🔥उंड्रीलाकडी सोफाशेट फर्निचरच्या गोदामाला भीषण आग..

कोंढवा परिसरातील उंड्री येथे रविवारी पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका लाकडी सोफाशेट फर्निचरचे गोदाम जळून खाक झाले. अग्नीशमन दलाच्या एकूण आठ फायरगाङ्याच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग लागल्याचे अद्याप कारण समजू शकले नाही

कोंढवा परिसरातील उंड्रीत ईश्वर कड यांच्या मालकीचे चार हजार चौरसफूट क्षेत्र असलेले ‘हॅशवूड’ लाकडी सोफाशेट फर्निचरच्या गोदामाला भीषण मोठी आग लागल्याची घटना आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. आग लागल्याच्या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाताच घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाच्या एकूण आठ फायरगाङ्याच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली आहे. गोदामात लाकूड, फोम, कागदपत्रे असे साहित्य असल्याने आग लगेच भडकली आणि आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग एवढी भीषण होती की गोदामाचे लोखंडी शेड देखील त्यात वितळून खूप मोठे नुकसान झाले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत लाकडी सोफाशेट फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याच्या घटनेची माहिती कोंढवा पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाला आग विझवण्या कामी मदत करून आग लागल्याच्या घटनेचा शोध घेत पुढील तपास करत आहे.

Post Bottom Ad

#

Pages