🚨 कोरोना रोगाबाबत अफवा पसवरल्या प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 16, 2020

🚨 कोरोना रोगाबाबत अफवा पसवरल्या प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल..


🚨 कोरोना रोगाबाबत अफवा पसवरल्या प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल..

कोरोना व्हायरस संदर्भात काही जणांकडून सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहेत. त्याचा अनुभव विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांना आला आहे. पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचा अफवेचा मेसेज त्यांना पाठविण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी अफवा पसरविल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खुद्द पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (वय 59) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरात कोरोना विषाणूमूळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे सर्व स्थरावर खबरदारी घेतली जात आहे. शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना व्हायरस संदर्भात मोठ्या प्रमाणात अफवाही पसरवल्या जात आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रत असल्याने खबरदारी म्हणून राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, जिम, मॉल, तसेच गर्दी होणारी ठिकाणे बंद केली आहेत. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनाच काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अनोळखी मोबाईलवरून काही मॅसेज आले. त्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आहेत. तर काही ठिकाणच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे. तसेच काही परदेशातील नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर म्हैसकर यांनी खात्री केली असता असा कुठलाच प्रकार समोर आला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले. यांनतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दाखल केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. भारतात थैमान घालणाऱ्या रोगाबाबत अफवा पसवरल्याप्रकरणी पुण्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Post Bottom Ad

#

Pages