🚨 पुण्यात सावकाऱ्याच्या व्याजाच्या पैसापायी मित्राचा खून केल्याचे उघड; सावकाराच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 18, 2020

🚨 पुण्यात सावकाऱ्याच्या व्याजाच्या पैसापायी मित्राचा खून केल्याचे उघड; सावकाराच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या..


🚨 पुण्यात सावकाऱ्याच्या व्याजाच्या पैसापायी मित्राचा खून केल्याचे उघड; सावकाराच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

भारत हा शेतीप्रधान देश असून महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना सावकाऱ्याच्या कर्जापायी आत्महत्त्या कराव्या लागत असल्याने महाराष्ट्र सरकारने सावकारी प्रतिबंधक कायदा करुन सावकाराच्या मुसक्या आवळून त्यांची धरपकड सुरूच असतांना पुण्या सारख्या सूसंकृत शहरात तीन महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी व्याजाच्या पैशापायी मित्राला ११ व्या मजल्यावरुन खाली ढकलून देऊन खून केल्याच्या घटनेत कोंढवा पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन तपास केला असता सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा सुहास शरद धांडेकर (वय-३०, रा. कोंढवा बा.गावठाण पुणे) यांच्याकडून १० टक्केच्या व्याजाच्या पैसापायी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

व्याजाच्या पैसापायी मित्राचा खून..
मयत सागर चिलेवरी व आरोपी १) अभिनव नारायण जाधव (वय - २३), २) अक्षय हनुमान गोरडे (वय - २२) , ३) तेजस रावसाहेब गुजर (वय - १९) हे सर्व कुल उत्सव सोसायटीतील फलॅटमध्ये बॅचलर म्हणून एकत्रित राहत होते. मयत तरुण सागर चिलेवरी याने वैयक्तिक कामासाठी आरोपी अभिनव जाधव याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. मयत तरुण सागर चिलेवरी याला व्याज व पैसे परत देत नाही या कारणावरूण आरोपी अभिनव जाधव, अक्षय गोरडे, तेजस गुजर या तिघांनी आपसात संगनमत करुन मंगळवार दि. १० मार्च २०२० रोजी होळी-धुळीवंदणाच्या दिवसी पहाटे ०१.४५ वाजण्याच्या सुमारास मयत तरुण सागर चिलवेरी याला स्वारगेट येथुन डिस्कव्हर मोटार सायकल नंबर एम.एच.१२ - जे.पी - ६४५५ वर बसवुन हाताने मारहान करत कुल उत्सव सोसायटीतील राहत असलेल्या ११ व्या मजल्यावरील फलॅटमध्ये आणुन मयत तरुण सागर चिलवेरी हा पैसे दते नाही म्हणुन मारहान करत त्याला ११ व्या मजल्यावरुन खाली ढकलुन देवुन त्याचा खुन केला आहे. याघटने प्रकरणी ओंकार चंद्रकांत येणपुरे (वय २०) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिस तपासात अशा प्रकारे सावकाराचे नाव झाले निष्पन्न..
कोंढवा पोलीस स्टेशनमधील दाखल खुनाच्या गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास पथकातील पोलिसांनी खुनातील आरोपी अभिनव नारायण जाधव (वय - २३), २) अक्षय हनुमान गोरडे (वय - २२), ३) तेजस रावसाहेब गुजर (वय - १९) यांचा दाखल गुन्हयात मंगळवार दि. १० मार्च २०२० रोजी सांयकाळी ०६.३० वाजण्याच्या सुमारास शोध घेत अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने गुन्हयाचा पुढील तपासाकामी आरोपीस शनिवार दि. १४ मार्च २०२० पर्यन्त पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. मा.न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत आरोपींची कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा सुहास शरद धांडेकर (वय-३०, रा. कोंढवा बा.गावठाण पुणे) यांचे नाव निष्पन्न झाले. खुनाच्या गुन्हयात वापरलेली डिस्कव्हर एम.एच- १२-जे.पी-६४५५ क्रमांकाची मोटार सायकल सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा सुहास धांडेकर याने घटनास्थळा वरुन इतरेत्र नेहून गुन्हयातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी सुहास धांडेकर याचे बॅक स्टेटमेन्ट तसेच तांत्रिक पुरावा प्राप्त करुन दाखल गुन्हयात मंगळवार दि.१७ मार्च २०२० रोजी दुपारी ०४.१५ वाजण्याच्या सुमारास कोंढवा तपास पथकातील पोलीसांनी अटक करुन दाखल गुन्ह्यात तपासकामी चौकशी केली असता आरोपी सुहास धांडेकर याच्याविरुध्द यापुर्वी कोंढवा पोलीस ठाणे गु.र.न. ४५१/२०१५ भादविसं कलम ३२६,३२५,५०४, ३४ अन्वये प्रमाणे व्याजाने दिलेले पैसे परत न केल्याने नागरिकांना मारहाण केल्याबाबत गुन्ह्याची नोंद आहे तसेच सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा आरोपी सुहास धांडेकर हा प्रति महीना १० टक्के व्याजाने सिंहगड कॉलेजच्या मुलांना पैसे दिले आहेत तसेच आरोपी व्याजाने पैसे देताना तारण म्हणुन मौल्यवान चिजवस्तु व वाहन तारण म्हणुन त्याच्या जवळ ठेवत असतो अशी माहिती तपासात मिळाली आहे. याबाबत कोंढवा तपास पथकातील पोलीस पुढील तपास करत आहेत.
सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा आरोपी सुहास धांडेकर यास कोंढवा पोलीसांनी अटक करत मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने गुन्हयाचा पुढील तपासाकामी आरोपीस रविवार दि.२२ मार्च २०२० पर्यत्न पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर दाखल गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. महादेव कुंभार करीत आहेत.

कोंढवा पोलीसांचे आरोपीबाबत नागरिकांना आवाहन..
कोंढवा पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील सावकारी व्याजाचा अवैध व्यावसाय करणारा आरोपी सुहास धांडेकर याने आणखी कोणाकोणाला व्याजाने रक्कम देवुन त्यांच्या चिजवस्तु व वाहन तारण ठेवल्या आहेत अशा नागरिक व कॉलेज तरुणांनी कोंढवा पोलीस स्टेशनशी संर्पक साधावा, असे अवाहन कोंढवा पोलीसांनी केले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्हयाचा तपासाची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. सुनिल फुलारी , मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री. सुहास बावचे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. सुनिल कलगुटकर , कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासी अधिकारी मा.पोलीस निरीक्षक श्री. महादेव कुंभार , तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. चेतन मोरे , पोलीस उप-निरिक्षक श्री. संतोष शिंदे , पोलीस हवलदार श्री. भोसले , पोलीस हवलदार श्री. विशाल गवळी , पोलीस हवलदार श्री. संतोष नाईक , पोलीस नाईक श्री. नितीन कांबळे , पोलीस नाईक श्री. योगेश कुभांर , पोलीस नाईक श्री. पृथ्वीराज पांडुळे , पोलीस नाईक श्री. नीलेश वणवे , पोलीस शिपाई श्री. अजिम शेख , पोलीस शिपाई श्री. मोहन मिसाळ यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages