😱 धक्कादायक..पुण्यात अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण करत तोंडावर केले मुत्रविसर्जन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 15, 2020

😱 धक्कादायक..पुण्यात अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण करत तोंडावर केले मुत्रविसर्जन..


😱 धक्कादायक.. पुण्यात अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण करत तोंडावर केले मुत्रविसर्जन..

किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून सराईत टोळक्याने लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी चौघा गुंडाना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

1) विनीत सुर्यकांत बिरादार (वय 19),
2) शुभम राजाभाऊ जाधव (वय 19, रा. समर्थनगर, पिंपरी-चिंचवड),
3) देविदास उर्फ देवा घनशाम पव्हणे (वय 21, रा. काळेपडळ),
4) भारत विशाल राठोड (वय 21, कुंजीरवस्ती),
5) सलीम कलिंदर शेख (वय 22, रा. घुलेवस्ती, मांजरी) 
अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पीडित मुलगा व त्याचे कुटूंबीय मांजरी परिसरात राहतात. दरम्यान, मुलगा 12 मार्च रोजी घराबाहेर पडला होता. परंतु, रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याचा पोलिस शोध घेत होते. त्याचवेळी हडपसर पोलिसांच्या बीट मार्शलला मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो बेशुद्ध असल्याने त्याची ओळख पटली नव्हती.

दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मुलगा तोच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना बोलावून त्याबाबत खात्री केली. पोलिसांनी मारहाण करणार्‍या तरुणांचा शोध घेऊन पाच जणांना ताब्यात घेतले.
सदर घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत

Post Bottom Ad

#

Pages