🙎🏻‍स्वारगेट पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 11, 2020

🙎🏻‍स्वारगेट पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..


🙎🏻‍ स्वारगेट पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.. 
मंगळवार दि.10 मार्च 2020 रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्त्व गाजवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आदर्श माता, शिक्षिका, वकील, डॉक्टर, स्वच्छता दूत, मोलकरीन महिलांचा "श्री. महिला गृह उद्योग लिज्जत पापड " यांच्या सौजन्याने मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री. सर्जेराव बाबर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्वारगेट पोलीस स्टेशन येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला "श्री.महिला गृह उद्योग लिज्जत पापड " चे श्री. कोते , मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. सर्जेराव बाबर , स्वारगेट पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ब्रह्मानंद नाईकवाडी , मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शब्बीरं सय्यद , पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. " सन्मान नारीशक्तीचा " या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात कर्तृत्त्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वारगेट पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ब्रह्मानंद नाईकवाडी म्हणाले , जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण राजमाता जिजाऊंना स्मरून आश्वासन देतो. आपल्याला कोणत्याही प्रसंगाला, समस्येला सामोरे जात असताना एक भाऊ म्हणून आम्हाला आवाज द्या. आम्ही आपल्यासाठी तत्परतेने उभे राहू, ही खात्री मी सर्व महिलांना देतो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री. सर्जेराव बाबर म्हणाले , ” महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आज सर्वच क्षेत्रात महिलांचे पाऊल पुढे पडत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. हे जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.

Post Bottom Ad

#

Pages