🚨 पुण्यात चप्पल व्यापाऱ्याच्या खुनातील मुख्य सुत्रधारास मोठया शस्त्रसाठयासह गुन्हे शाखा युनिट २ ने शीताफीने केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 20, 2020

🚨 पुण्यात चप्पल व्यापाऱ्याच्या खुनातील मुख्य सुत्रधारास मोठया शस्त्रसाठयासह गुन्हे शाखा युनिट २ ने शीताफीने केली अटक..


🚨 पुण्यात चप्पल व्यापाऱ्याच्या खुनातील मुख्य सुत्रधारास मोठया शस्त्रसाठयासह गुन्हे शाखा युनिट २ ने शीताफीने केली अटक..

पुणे शहरातील लक्ष्मीरोड येथील चप्पल व्यापारी चंदन सेवानी यांचे शनिवार दि. ४ जानेवारी २०२० रोजी अपहरण करून २ करोड रूपयाची खंडणी मागुण ती देण्यास नकार दिल्याने आरोपींनी लोणंदजवळ पाडेगाव ता. खंडाळा जि.सातारा येथील निर्जन ठिकाणी गोळया घालुन खुन केल्याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्य़ाचा गुन्हे शाखा पुणे युनिट २ ने तपास करत ५ आरोपींना अटक केली मात्र खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार परवेज हनिफ शेख हा आरोपी वेळोवेळी पोलीसांना चकवा देण्यात यशस्वी होत होता. त्याचा शोध घेत असता मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी परवेज हनिफ शेख याला मोठया शस्त्रसाठयासह गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या दाखल गुन्ह्यातील सर्व ६ आरोपींना गुन्हे शाखा पुणे युनिट २ च्या तपास पथकाने अटक करत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

व्यापाऱ्याचे अपहरण करून गोळया घालुन खुन करणारे आरोपी
१) खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार परवेज हनिफ शेख (वय ४२, सातारा) याला मोठया शस्त्रसाठयासह गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलिसांनी सातारा येथे शीताफीने ताब्यात घेत बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील भा.द.वि ३०२,३६४,३८७,३९७,२०१,३४ सह ३/२५ भा.ह.का प्रमाणे दाखल गुन्ह्य़ात अटक केली आहे.
२) आफ्रिदी रौफ खान (वय २३, रा.नानापेठ, पुणे),
३) सुनील नामदेव गायकवाड (वय ४९, रा.शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे),
४) अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय २१, रा.ब्राम्हण आळी,सासवड, ता.पुरंदर,जि.पुणे),
५) किरण सुनिल कदम (वय २१, रा.मालगाव,जि.सातारा),
६) प्रितम रमेश आंबरे (वय ३६, रा.पुन्यनगरी को.हौ.सो, बिबवेवाडी, पुणे) या ५ आरोपीना यापूर्वीच दाखल खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलिसांनी खुनाच्या दाखल गुन्ह्याचा असा लावला छडा..
शनिवार दि. ४ जानेवारी २०२० रोजी लक्ष्मीरोड येथील चप्पल व्यापारी चंदन सेवानी यांचे अपहरण करून त्यांना
२ करोड रूपयाची खंडणी मागुण ती देण्यास नकार दिला असता त्यांना लोणंदजवळ पाडेगाव ता. खंडाळा जि.सातारा येथील निर्जन ठिकाणी गोळया घालुन खुन केल्याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि ३०२,३६४,३८७,३९७,२०१,३४ सह ३/२५ भा.ह.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट २ कडे वर्ग करण्यात आला असता गुन्हे शाखा युनिट २ चे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र जगताप यांनी दाखल खुनाच्या गुन्ह्याच्या तपासकामी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधीकारी व पोलीस कर्मचारी यांना आदेशीत केल्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलीसांनी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी १) आफ्रिदी रौफ खान (वय २३, रा. नाना पेठ, पुणे), २) सुनील नामदेव
गायकवाड (वय ४९, रा.शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे), ३) अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय २१, रा.ब्राम्हण आळी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), ४) किरण सुनिल कदम (वय २१, रा.मालगाव, जि.सातारा), ५) प्रितम रमेश आंबरे (वय ३६, रा.पुन्यनगरी को.हौ.सो, बिबवेवाडी, पुणे) यांना अटक केली होती. परंतु दाखल खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार परवेज हनिफ शेख हा कर्नाटक, मध्यप्रदेश, नेपाळ, सातारा, सांगली, कराड भागात असल्याबाबत गोपणीय माहिती मिळाल्याने मा.गुन्हे शाखा अप्पर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.शिवाजी पवार यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकाने मीळालेल्या माहितीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी परवेज शेख हा वेळोवेळी पोलीसांना चकवा देण्यात यशस्वी होत होता. खुनाच्या दाखल गुन्ह्यात यापूर्वीच अटक केलेला आरोपी किरण कदम याने पाहिजे असलेला खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी परवेज शेख याच्याकडे मोठया प्रमाणात अग्निशस्त्राचा साठा असल्याबाबतची माहिती दिली होती.

दाखल खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपीच्या पोलीसांनी अशा आवळल्या मुसक्या..
गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलीस खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी परवेज शेख याचा शोध घेत असतांना आरोपी परवेज शेख हा सातारा, सांगली भागातुन लोकांकडे खंडणीची मागणी करीत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट २ च्या तपास पथकातील पोलीसांनी सातारा भागात आरोपीचा शोध घेत असतांना गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक श्री.प्रताप शेळके, पोलीस नाईक श्री.यशवंत खंदारे व पोलीस नाईक श्री.कादिर शेख यांना आरोपी परवेज शेख हा त्याच्या जवळ असलेले पिस्टल विक्री करण्यासाठी माहूली संगम घाट, जि.सातारा येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे मा.गुन्हे शाखा अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.शिवाजी पवार व गुन्हे शाखा युनिट २ चे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र जगताप यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधीकारी व पोलीस कर्मचारीसह मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माहूली संगम घाट, जि.सातारा याठिकाणी स्थानीक स्थागुशा सातारा पोलीसांच्या मदतीने आरोपी परवेज शेख याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी परवेज शेख याच्या जवळ १ लाख रूपये किंमतीचे गावठी बनावटीची ३ पिस्टल, पिस्टलच्या २ अतिरिक्त मॅगझीन व पिस्टलची ४० जिवंत काडतुसे, ८ हजार रूपये किंमतीचे २ मोबाईल फोन, रोख रक्कम १५४०/- रूपये व काही कागदपत्रे असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक केलेला सराईत गुन्हेगार परवेज शेख याच्यावर सातारा सांगली भागात खुन, जबरी चोरी, दरोडा, चोरी, घरफोडी, खंडणीसाठी अपहरण करूण खुन करणे, अग्निशस्त्र सोबत बाळगणे अशा प्रकारचे एकुण १८ गुन्हे दाखल आहेत. तसेच फरार दोन महिन्याच्या कालावधीत आरोपीवर खंडणी, जबरी चोरी, बेकायदेशीररित्या आग्नीशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे ३ गुन्हे सातारा व सांगली येथे दाखल आहेत.

दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल व शस्त्रसाठा जप्त..
दाखल खुनाच्या गुन्ह्यात यापुर्वीच अटकेत असलेल्या आरोपीकडून ८५ हजार रूपये किंमतीचे ३ गावठी बनावटीचे पिस्टल, ३ अतिरिक्त मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे,४० हजार रूपये किंमतीची गुन्हयात वापरलेली अॅक्टीवा गाडी , १ लाख रूपये किंमतीची अपहरणासाठी वापरलेली चारचाकी वॅगनआर कार, १२ हजार रूपये किंमतीचे ४ मोबाईल फोन असा मुददेमाल यापुर्वीच जप्त करण्यात आला आहे.
खुनाच्या दाखल गुन्हयातील सर्व आरोपींकडून एकूण ६ गावठी पिस्टल, ५ पिस्टलचे मॅगझीन व एकूण ५८ जिवंत काडतूसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांच्या सखोल चौकशीत आरोपी परवेज शेखने दिली माहिती..
शनिवार दि. ४ जानेवारी २०२० रोजी घटनेच्या १५ दिवस आगोदरपासून आरोपींनी लक्ष्मीरोड येथील चप्पल व्यापारी चंदन सेवानी यांचे अपहरणाचा कट करीत होते. चंदन सेवानी याचे आर्थिक कारभार, त्यांची दिनचर्या व त्यांचे खाजगी जीवनाबाबतची माहिती चंदन सेवानी यांचेकडे काम करणारा सुनिल गायकवाड यांने आरोपी परवेज शेख याला माहिती दिली त्या बदल्यात खंडणीतुन मिळालेल्या रकमेतील २५ टक्के वाटा त्यास देण्याचे ठरले होते. आरोपी आफ्रिदी खान, आजिंक्य धुमाळ, परवेज शेख यांनी घटनेच्या दिवशी चंदन सेवानी यांचे दुकानाजवळ हजर राहून तसेच पाठलाग करताना आजुबाजुला लक्ष ठेवत आरोपींनी चंदन सेवानी हे त्यांच्या कारमधून खाली उतरताच त्यांना चारचाकी वॅगनआर कारमध्ये जबरदस्तीने ढकलुन बसल्यावर आरोपींनी चंदन सेवानी यांना मारहाण करत पिस्टलचा धाक दाखवून २ करोड रुपयाची खंडणी मागीतली. चंदन सेवानी यांनी एवढी रक्कम आत्ता देऊ शकत नसल्याचे सांगीतल्याने तसेच त्यासाठी काही मुदत देण्याची मागणी केल्याने आरोपींनी चिडून जाऊन चंदन सेवानी यांना गोळया घालुन ठार केले व आरोपींनी "२ करोड रूपये नही दिया इसलिए भाईके ऑर्डर पे ठोकणा पडा" अशा मजकुराची इंग्रजीत लिहीलेली चिठठी मयत चंदन सेवानी यांच्या खिशात लिहूण ठेवली.

पोलिसांचे नागरीकांना वाहन..
अटक केलेला आरोपी परवेज शेख व गुन्ह्यातील त्याचे साथीदार यांनी कोणाकडे खंडणीची मागणी केली असल्यास बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये कींवा गुन्हे शाखा युनिट २ कडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सदरची कामगीरी,
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. डॉ . व्यंकटेशम,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रविंद्र शिसवे,
मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. अशोक मोराळे,
मा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. बच्चन सिंग यांच्या
मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. शिवाजी पवार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. विजय चौधरी यांच्य नेतृत्वाखाली गुन्हे शाखा पुणे युनिट २ चे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप, गुन्हे शाखा युनिट २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रताप शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री. यशवंत आंब्रे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री. संजय दळवी, सहाय्यक पोलीस फौजदार श्री. अनिल उसुलकर, पोलीस नाईक श्री. यशवंत खंदारे, पोलीस नाईक श्री. अतुल गायकवाड, पोलीस नाईक श्री. उत्तम तारु, पोलीस नाईक श्री. विशाल भिलारे, पोलीस नाईक श्री. दाऊद सय्यद, पोलीस शिपाई श्री. कादीर शेख, पोलीस शिपाई श्री. मितेश चोरमोले, पोलीस शिपाई श्री. गोपाल मदने, पोलीस शिपाई श्री. अजित फरांदे, पोलीस शिपाई श्री. विवेक जाधव व स्थागुशा सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, स्थागुशा सातारा तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages