🚨 पुण्यात दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या स्वारगेट पोलीसांनी आवळ्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 22, 2020

🚨 पुण्यात दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या स्वारगेट पोलीसांनी आवळ्या मुसक्या..


🚨 पुण्यात दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या स्वारगेट पोलीसांनी आवळ्या मुसक्या..

पुणे शहरात स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत तीन वर्षापुर्वी झालेल्या "सशस्त्र दरोडा व लूटमारीच्या" या वेगवेगळ्या दोन दाखल गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींची स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्री. सोमनाथ कांबळे व पोलीस शिपाई श्री. संदिप साळवे यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे दाखल एका गुन्ह्यात आरोपीला अहमदनगर येथून व दाखल दुसऱ्या गुन्ह्यात आरोपीला सारसबाग चौपाटी, स्वारगेट, पुणे येथून अशा वेगवेगळ्या दोन ठिकाणी स्वारगेट तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून शिताफीने दोन आरोपींना अटक केली आहे.

१) सशस्त्र दरोड्याच्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी संजय उर्फ फकड्या सुनिल अडागळे (वय ३०, रा.सिध्दार्थ नगर, अहमदनगर) यास स्वारगेट तपास पथकातील पोलिसांनी अहमदनगर पोलिसांची मदत घेवुन अहमदनगर येथे सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.
२) लूटमारीच्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी आसिफ जावेद शेख (रा.पर्वतीदर्शन, पुणे-सातारा, पुणे) यास स्वारगेट तपास पथकातील पोलिसांनी सारसबाग चौपाटी,स्वारगेट,पुणे येथे सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.

तीन वर्षापासून सशस्त्र दरोड्याच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या ..
पुणे शहरात स्वारगेट परिसरात तीन वर्षापुर्वी डायसप्लॉट गुलटेकडी येथे टाक कुटुंबीयांचे घरी सशस्त्र दरोडा टाकुन फरार झालेला आरोपी संजय उर्फ फकड्या अडागळे हा सिध्दार्थ नगर सिव्हील हॉस्पीटल समोर अहमदनगर येथे राहत असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोमनाथ कांबळे व पोलीस शिपाई श्री.संदिप साळवे यांना त्याच्या बातमीदाराकडून मिळाली हि माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ब्रम्हानंद नाईकवाडी, स्वारगेट पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.शब्बीर सय्यद यांना देत त्यांनी दिलेल्या सुचणेप्रमाणे स्वारगेट तपास पथकाचे अधिकारी श्री.सुरेश जायभाय व तपासपथकाचे कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अहमदनगर येथे रवाना होवुन तोफखाना पोलीस ठाणे अहमदनगर येथिल पोलिसांची मदत घेवुन स्वारगेट पोलीस ठाणे अभिलेखावरील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी संजय उर्फ फकड्या सुनिल अडागळे (वय ३०, रा.सिध्दार्थ नगर, अहमदनगर) यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेत स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणुन स्वारगेट पोलीस ठाणे गु.र.नं. ४३०/२०१७ भा.द.वि.कलम
३९५,३९७,४५२,४२७,५०६,५०४ आर्म अॅक्ट ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)सह १३५ क्रिमिनल लॉ अमेन्टमेंट लॉ कलम ७ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक केली आहे.

तीन वर्षापासून लूटमारीच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या..
पुणे शहर स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत तीन वर्षा पुर्वी सराईत गुन्हेगारांनी लक्ष्मीनारायण टॉकीज चौका जवळील मच्छीमार्केट येथे एका इसमास अडवुन त्यास मारहाण करुन त्याचे जवळील २६०००/- रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा स्वारगेट पोलिसांनी तपास करत सराईत गुन्हेगार १) संदिप बाबूलाल कोरी (वय-२१, रा.पर्वती दर्शन, पुणे), २)अनिकेत कैलास गायकवाड (वय-२२, रा.पर्वती दर्शन, पुणे), ३) सौरभ सुनिल ऐनपुरे (वय-२०, रा.स्वप्नपुर्ती सोसायटी, पर्वती, पुणे) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांचा गुन्ह्यातील साथीदार आरोपी आसिफ जावेद शेख (रा.पर्वतीदर्शन, पुणे-सातारा, पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार असुन सतत तीन वर्ष पोलीसांना हुलकावण्या देत होता. तो सध्या सारसबाग चौपाटी येथे आला असल्याची बातमी स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्री.सोमनाथ कांबळे व पोलीस शिपाई श्री.संदिप साळवे यांना मिळताच त्यांनी तात्काळ हि माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ब्रम्हानंद नाईकवाडी, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.शब्बीर सय्यद यांना कळवत त्यांनी दीलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी श्री.सुरेश जायभाय, तपास पथकाचे कर्मचारी यांना मिळालेल्या माहिती आधारे सारसबाग चौपाटी याठीकाणी सापळा लावुन गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी आसिफ जावेद शेख (रा.पर्वतीदर्शन, पुणे-सातारा रोड,पुणे) याला शिताफिने ताब्यात घेत स्वारगेट पोलीस ठाणे गु.र.नं. २३०/२०१७ भा.द.वि.कलम ३९४,३४१,४११,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक केली आहे.

सदर दोन वेगवेगळ्या दाखल गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींनी तीन वर्षाच्या काळात त्यांना कोणी मदत केली व तीन वर्षाच्या काळात त्यांनी कोणकोणते गुन्हे केले आहेत का ? याचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

सदर वेगवेगळ्या दाखल दोन गुन्ह्याची कामगिरी,
मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा.विभाग श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ पुणे श्री. शिरिष सरदेशपांडे, मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ब्रम्हानंद नाईकवाडी, स्वारगेट पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शब्बीर सय्यद यांच्या सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री. सुरेश जायभाय, पोलीस हवालदार श्री. गभाले, पोलीस हवलदार श्री. कदम, पोलीस नाईक श्री. खोमणे, पोलीस शिपाई श्री. साळवे, पोलीस शिपाई श्री. कांबळे, पोलीस शिपाई श्री. दळवी, पोलीस शिपाई श्री. सरक, पोलीस शिपाई श्री. भोकरे, महिला पोलीस शिपाई गरुड यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages