🏦 १ एप्रिल २०२० पासून दहा बँकांचे चार बँकांत विलीनीकरण.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 5, 2020

🏦 १ एप्रिल २०२० पासून दहा बँकांचे चार बँकांत विलीनीकरण..

🏦 एप्रिल २०२० पासून दहा बँकांचे चार बँकांत विलीनीकरण..

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचा दुसरा टप्पा राबविताना मोदी सरकारने दहा आघाडीच्या बँकांचे नव्या वित्त वर्षांच्या प्रारंभापासून चार बँकांमध्ये एकत्रीकरणाच्या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत, येत्या १ एप्रिल २०२० पासून या महाविलीनीकरणाला मूर्तरूप देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

यानुसार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन होणार आहेत, तर सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा बँकेत होत आहे. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचा समावेश युनियन बँक ऑफ इंडियात, तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत समाविष्ट होईल.

बँकांच्या महाविलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७ वरून १२ वर येणार आहे. त्यात व्यवसायाच्या दृष्टीने सात मोठय़ा, तर पाच छोटय़ा बँकाच राहतील.  २०१७ पासूनच्या विलीनीकरणानंतर वार्षिक ८ लाख कोटी व्यवसाय असलेल्या प्रत्येकी सात बँका झाल्या आहेत. ५२ लाख कोटी रुपये व्यवसायासह स्टेट बँक अव्वलस्थानी, तर पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या स्थानी आहे.

सुलभ व्यवसायाच्या दिशेने केंद्र सरकारने बुधवारी कंपनी कायद्यात थेट ७२ दुरूस्त्यांचे पाऊल टाकले. कंपनी कायदा, २०१३ संबंधी समितीने सुचविलेल्या शिफारशींना अंतिम रूप देताना सरकारने फौजदारी कारवाईची ६६ पैकी २३ कलमे रद्द केली. मंत्रिमंडळबैठकीनंतर पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, कंपनी कायद्याच्या उल्लंघनासाठी असलेली तुरुंगवास आणि दंडाची कलमेही कमी करण्यात आल्याचे सांगितले. व्यवसायसुलभतेसाठीच, सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांवर ५० लाख रुपये अथवा कमी खर्च करणे कायद्याने बंधनकारक असलेल्या कंपन्यांना स्वतंत्र ‘सीएसआर समिती’ स्थापित करण्याची आता आवश्यकता राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. 🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..

Post Bottom Ad

#

Pages