🚨 पुण्यात दोन कोटीच्या खंडणीसाठी खुन केल्याच्या गुन्हयातील ४ था आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ ने केला जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 7, 2020

🚨 पुण्यात दोन कोटीच्या खंडणीसाठी खुन केल्याच्या गुन्हयातील ४ था आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ ने केला जेरबंद..

🚨 पुण्यात दोन कोटीच्या खंडणीसाठी खुन केल्याच्या गुन्हयातील ४ था आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ ने केला जेरबंद..

पुणे शहर बंडगार्डन पोलीस स्टेशच्या अभिलेखावरील दोन कोटीच्या खंडणीसाठी खुन केल्याच्या दाखल गुन्हयातील पाहीजे असलेला ४ था आरोपी किरण सुनिल कदम (वय २१) हा त्याच्या वडीलांना भेटायला विसावा नाका, सातारा शहर येथे येणार असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस शिपाई कादीर शेख यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने आरोपी किरण कदम यास ताब्यात घेवुन अटक केली आहे.

दोन कोटीच्या खंडणीसाठी खुन करणारे आरोपी
१) आफ्रीदी रौफ खान (वय २३, रा.मनुशा मशीदजवळ, नाना पेठ
पुणे),
२) सुनिल नामदेव गायकवाड (वय ४९,रा. शिवनेरीनगर,गल्ली नं.९,कोंढवा,पुणे),
३)अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय २१, रा. ब्राम्हण आळी, सासवड जि. पुणे) या सर्वानां खूनाच्या गुन्हयात यापुर्वीच अटक करण्यात आलेली आहे.
४) दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी किरण सुनिल कदम (वय २१, रा.राजेंद्र चिंचकर निवास,अष्टविनायक कॉलनी,हडपसर,पुणे. मुळ रा. मालगाव ता. जि. सातारा) याला सातारा शहर येथे गुन्हे शाखा युनिट-२ने स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने आरोपीस अटक केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा.रजि.नंबर ०८/२०२० भा.दं.वि.कलम ३०२,३६४,३८७,३९७,२०१,३४ व
आर्म अॅक्ट कलम ३ (२५) मधील मयत चंदन कृपालदास शेवानी (वय ४८, रा. डी.११४ परमार पॅराडाईज,सेंट्रल बिल्डींगजवळ पुणे) यांचे संगम पार्क मालधक्का चौक दुर्गा रेस्टॉरंट स्टार ईव्हेट कंपनी समोरुन अपहरण करुन त्याना लोणंद जवळ पाडेगाव ता. खंडाळा याठिकाणी कॅनल जवळ निर्जन ठिकाणी नेऊन दोन कोटीच्या खंडणीसाठी अग्नीशस्त्रासारख्या हत्याराने गोळया झाडुन खुन केला आहे. सदर बाबत मयताचा भाऊ
गोविंद कृपालदास शेवानी यानी लोणंद पोलीस ठाणे सातारा येथे तक्रार दिल्याने ती लोणंद पोलीस ठाणे गुन्हारजि नं.००/२०२०,दिनांक ०५/०१/२०२० अन्वये नोंद करुन बंडगार्डन पोलीस ठाणे येथे पाठविल्याने वरील प्रमाणे गुन्हा रजि नोंद करण्यात आला आहे. खूनाच्या गुन्हयात यापुर्वी १) आफ्रीदी रौफ खान (वय २३, रा.मनुशा मशीदजवळ, नाना पेठ पुणे), २) सुनिल नामदेव गायकवाड (वय ४९,रा. शिवनेरीनगर,गल्ली नं.९,कोंढवा,पुणे) ३)अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय २१, रा. ब्राम्हण आळी, सासवड जि. पुणे) या सर्वानां अटक करण्यात आलेली आहे. ४) दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी किरण सुनिल कदम (वय २१, रा.राजेंद्र चिंचकर निवास,अष्टविनायक कॉलनी,हडपसर,पुणे. मुळ रा. मालगाव ता. जि. सातारा) हा त्याच्या वडीलांना भेटायला विसावा नाका, सातारा शहर येथे येणार असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस शिपाई कादीर शेख यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने आरोपी किरण कदम यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी किरण कदम हा गुन्हयाचे कटात तसेच प्रत्यक्ष गुन्हा करण्यामध्ये सक्रियतेने सहभागी होता अशी त्याने कबुली दिली आहे. त्याची दिनांक १३ मार्च २०२० रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असुन गुन्हयाचे अनुशंगाने अटक आरोपीकडुन महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत त्या दृष्टीने तपास चालु आहे. तसेच दाखल गुन्हयात आणखीन दोन आरोपी लवकरच हाती लागण्याची खात्रीशिर माहीती आहे.

सदरची कामगीरी,
मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे,
मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप युनिट-२ गुन्हे शाखा पुणे शहर व त्यांच्या स्टाफने केलेली आहे.

Post Bottom Ad

#

Pages