💐 बोटीवरील ८८ प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचे गृहमंत्र्यांनी सत्कार करून केले कौतुक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 16, 2020

💐 बोटीवरील ८८ प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचे गृहमंत्र्यांनी सत्कार करून केले कौतुक..


💐 बोटीवरील ८८ प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचे गृहमंत्र्यांनी सत्कार करून केले कौतुक..

गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून अलिबागला निघालेल्या बोटीचा मांडावा बंदराजवळ १४ मार्च रोजी अपघात झाला. या बुडणाऱ्या बोटीवरील ८८ प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांचे गृहमंत्र्यांनी सत्कार करून कौतुक केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडवा पोलिस नाईक प्रशांत घरत यांचं जाहीर कौतुक केलं.

पोलिस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत लाँचमधील ८८ प्रवाशांचा प्राण वाचला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून प्रशांत घरात यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर या घटनेची गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दाखल घेतली आहे. ”अवघ्या महाराष्ट्राच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या बहादुराला गृहमंत्री म्हणून माझाही महासॅल्यूट’, असं ट्विटर अनिल देशमुख यांनी केलंय. तसेच त्यांचा सत्कारही केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

दरम्यान, १४ मार्च रोजी मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट अलिबागजवळ मांडावा बंदरा जवळ २०० मीटर अंतरावर असताना बोट बुडू लागली. बोटीला खाली दगड लागल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी बोटीत ८८ प्रवासी होते. मांडावा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी सदगुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तात्काळ पाठवून दिले. यावेळी प्रसंगावधान राखत पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रवाशांचे प्राण वाचवले. यावेळी घरत यांच्यासोबत बोटीवरील  दोन खलाशांनी  बुडणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचविण्यास मदत केली.

पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला.भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो सेवा आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. या बोटीच्या चाचणीवेळीही मांडवा टर्मिनलवर बोट धडकून अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळीही अपघाताची व्याप्ती मोठी नव्हती.

Post Bottom Ad

#

Pages