👌 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात बिबवेवाडी पोलीसांतील माणुसकीचे दर्शन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 28, 2020

👌 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात बिबवेवाडी पोलीसांतील माणुसकीचे दर्शन..


👌 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात बिबवेवाडी पोलीसांतील माणुसकीचे दर्शन..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्याच्या प्रसाद, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे अशी पोलीसिंग करण्याबरोबरच या काळात बिगारीचे काम बंद झाल्याने पैशाच्या तुटवड्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या कुटुंबियांना घर उपयोगी किराणामाल व एक हजार रुपये रोख रक्कम मदत करून बिबवेवाडी पोलिसांनी अनोख्या स्वरुपात माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे.

भुकेने व्याकूळ झालेल्या कुटुंबाला बिबवेवाडी पोलिसांनी अशी केली मदत..
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण भारतात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदी व लॉकडाऊनमुळे कामकाज बंद असल्याने पैसाच्या तुटवड्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आल्याने घरातल्यानी कोणीही काही खालेले नाही. आम्हास खाण्यास काहितरी पाहिजे या आशयाचा शुक्रवार दि.२७ मार्च रोजी सांयकाळी ०४.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे पोलीस नियंत्रणकक्ष येथुन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मदतीचा कॉल प्राप्त होताच बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.ओ.सहाय्यक पोलीस फौजदार श्री.अमृत पाटील व गोपनियचे पोलीस हवालदार श्री.तणपुरे, पोलीस शिपाई श्री.गुजर, पोलीस शिपाई श्री.तानाजी सागर, पोलीस शिपाई श्री.राख यांनी कॉलच्या ठिकाणी जावुन माहिती घेतली असता बिगारीचे काम करणारे कुटूंब प्रमुख व त्यांची पत्नी, पाच मुले हे भुकेने व्याकुळ अवस्थेत दिसून आल्याने बिबवेवाडी पोलीसांनी या कुटूंबास व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेत लागलीच त्वरित घर उपयोगी किराणा माल खरेदी करून दिले तसेच अग्निशामन दलाचे कर्मचारी श्री.मंगेश बोंबले यांनी कुटूंबास १ हजार रोख रुपये रक्कम व बिस्कीटचे पुडे अशी मदत केली आहे.

माणुसकीची ओळख..
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.ओ.सहाय्यक पोलीस फौजदार श्री.अमृत पाटील, गोपनियचे पोलीस हवालदार श्री.तणपुरे, पोलीस शिपाई श्री.गुजर, पोलीस शिपाई श्री.तानाजी सागर, पोलीस शिपाई श्री.राख व अग्निशामन दलाचे कर्मचारी श्री.मंगेश बोंबले यांनी संचारबंदीच्या काळात कुटूंबास मदत करत माणुसकीची ओळख करून दिली आहे.

Post Bottom Ad

#

Pages