📱होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचे "महाराष्ट्र होम क्वारंटाइन ट्रॅकिंग सिस्टिम" (महा एचक्युटीएस) हे स्वतंत्र मोबाईल अॅप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 29, 2020

📱होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचे "महाराष्ट्र होम क्वारंटाइन ट्रॅकिंग सिस्टिम" (महा एचक्युटीएस) हे स्वतंत्र मोबाईल अॅप..


📱 होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचे " महाराष्ट्र होम क्वारंटाइन ट्रॅकिंग सिस्टिम " ( महा एचक्युटीएस ) हे स्वतंत्र मोबाईल अॅप..

पुणे शहरात परदेश प्रवास करून आलेल्या, मात्र त्या प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून न आल्याने त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) केल्यानंतरही संबंधीत व्यक्ती समजामध्ये फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी "महाराष्ट्र होम क्वारंटाइन ट्रॅकिंग सिस्टिम" (महा एचक्युटीएस) हे स्वतंत्र मोबाईल अॅप तयार केले आहे. त्यामुळे आता होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती पोलिसांच्या ऑनलाईन देखरेखीखाली राहणार आहेत.

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळल्यानंतर जिल्हा व पोलिस प्रशासनाकडुन कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत जाऊ नये, यासाठी विविध पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. विशेषत: परदेश प्रवास करून पुणे येथे परत आलेल्या प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून आली नसली तरीही त्यांना पुढील १४ दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी होम क्वारंटाइन करण्यात आले होते.

प्रत्यक्षात मात्र, विलगीकरण कक्षात राहण्याची सुचना दिलेल्या काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या घटना राज्यात काही ठिकाणी निदर्शनास आल्या होत्या. पुणे शहरातील अशा व्यक्ती घरी असल्याची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे पोलिसांना सुचना दिल्या होत्या.

दरम्यान, पुणे पोलिसांनी होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवन्यासाठी 152 पोलिस पथके तयार केली होती.प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असून त्यांना ग्लोव्हज, मास्क व सॅनिटायझर अशा आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या. या पथकाने शहरातील 1276 होम क्वारंटाइनची प्रत्येक व्यक्तिच्या घरी जाऊन तो हजर असल्याची खात्री केली होती.पडताळणी केली होती. तर दुसऱ्या टप्प्यात घरी मिळून आलेल्या ८२१ व्यक्तींचा दररोजचा संपर्क टाळण्यासाठी पोलिसां नी त्यांना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या घरातील विशिष्ठ जागेवर उभे राहून उत्तर देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्या व्यक्ती घराबाहेर पडतात का? याची खातरजमा करण्यासाठी शेजारी कुटुंबाची निगराणीकामी मदत घेण्यात येत आहे.

असे आहे 'महा एचक्यूटीएस' !..
पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्या संकल्पनेतुन पुणे पोलिसांनी बंगळुर येथील कोटा व्हिजन लॅबच्या मदतीने फेशिअल रीकगनेशन सिस्टिम (Facial Recognition system) आधारित स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप http://106.51.74.239:8083 / download_apk या वेबसाईटवरुन कार्यान्वित करता येते. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालकडील संकलित केलेली माहिती संबंधीत वेबसाईटवर नोंदणी करण्यात आली आहे. तर काहीनां ही माहिती भरण्यासाठी मेसेजही पाठविण्यात आले आहेत.

'महा एचक्यूटीएस'ची वैशिष्टये..
होम क्वारंटाइन व्यक्तिला विशिष्ठ ठिकाणी उभे राहून किंवा घडयाळासमोर आपल्या मोबाईललवर सेल्फी घेऊन तो फोटो या अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.
संबंधीत ठिकाणचे भौगोलिक अक्षांश / रेखांश स्थान नोंदवले जाणार आहे.
होम क्वारंटाइन व्यक्तिने सदर एका दिवसात सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत किमान २ वेळा आपला फोटो अपलोड करायचा आहे.
होम क्वारंटाइन व्यक्तिने तसे न केल्यास त्याची अनुपस्थिती लागेल. त्यानंतर काही वेळातच पोलीसांच्या पद्धतीनुसार त्याची पडताळणी होईल.
पोलीस कर्मचाऱ्याला होम क्वारंटाइनच्या घरी जावे लागणार नसल्याने कोरोनाचा संसर्ग टळणार.
होम क्वारंटाइनच्या मागावर राहण्यासाठी होणारे श्रम व वेळही वाचणार.
संबंधीत अॅप गुगल प्लेस्टोअरवरून उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे.
याद्वारे पोलिसांना संशयित कोरोना संसर्गित व्यक्तींवर बारकाईने व बिनचूक लक्ष ठेवता येइल.
या अॅपची उपयोगिता लक्षात घेऊन राज्यातील अनेक जिल्ह्यांत या प्रणालीचा वापर होणार होणार आहे.
 


Post Bottom Ad

#

Pages