😱 धक्कादायक घटना..पत्नीने पतीचा खून केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 3, 2020

😱 धक्कादायक घटना..पत्नीने पतीचा खून केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर..🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..
😱 धक्कादायक घटना..पत्नीने पतीचा खून केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर..

पत्नीनेच पतीवर कोयत्याने वार करून खून केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावर घडली आहे. ही घटना नऱ्हे-धायरी रोडवरील नवले हॉस्पिटलसमोर पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

पुंडलिक करे (वय 27 वर्ष) असे खून झाल्याचे नाव आहे. तर पत्नी अनुराधा पुंडलिक करे (वय 25 वर्ष) महिलेला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुंडलिक आणि अनुराधा धायरी परिसरात राहण्यास आहेत. आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अचानक रक्ताने माखलेल्या हातांनी धावतच अनुराधा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना पतीचा खून केल्याचे संगितले. त्यांनतर हे ऐकताच पोलिसांनी धावपळ सुरू झाली. रक्ताने माखलेल्या हाताने महिलाच पोलीस ठाण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुराधाने नेमका खून का केला याचा तपास पोलीस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages