🙎महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 8, 2020

🙎महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती..

🙎 महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती..

जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांकडून उपक्रम हाती घेतले जात असून, आज पुण्यातील गजबजलेल्या लाल महाल ते दत्त मंदिरापर्यंत महिला वाहतूक नियमांचं काम पाहणार आहेत. या उपक्रमास आजच्या दिवशी सुरुवात झाली असून, एखादा विभाग महिलांच्या हाती असलेलं, देशातील पहिलाच वाहतूक विभाग ठरला आहे. या अशा अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यात मध्यवस्थीची वाहतूक कायमच डोकेदुखी असते. कायमच परिसरात वर्दळीचा असतो. त्यात व्यापाऱ्याच्या दुकानांमुळे प्रचंड गर्दी असते. कामानिमित्त दररोज हजारो वाहनचालक मध्यवस्थीत येतात. तसेच, सकाळी आणि सायंकाळी परिसरातील वाहतूक सुरळित ठेवणे, बेशिस्तांना शिस्त लावणे, पार्किंग प्रश्न, विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ट्रीपलसीट, झेब्रा क्रॉसिंग यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी महिला दिनानिमित्त रविवारपासून पुणे फरासखाना वाहतूक विभाग कायमस्वरूपी महिलांच्या हाती सोपविला आहे. पथकात 36 महिलांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक सौ.स्वाती थोरात या इन्चार्ज आहेत.

महिला पोलीस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक के. बी. म्हस्के यांच्यासह 36 महिलांकडून वाहतूकीचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

फरासखाना महिला वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सौ.स्वाती थोरात..
या उपक्रमा बाबत फरासखाना वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात म्हणाल्या की, ‘पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आणि दत्त मंदिर हा पुणे शहरातील गजबजलेला परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या ठिकाणी महिलांची सर्वाधिक वर्दळ असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विभागात महिला वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निश्चित निर्माण होणार आहे,’ असं त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages