😱 पुण्यात होळीच्या सणाला गालबोट; धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 10, 2020

😱 पुण्यात होळीच्या सणाला गालबोट; धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा..


😱 पुण्यात होळीच्या सणाला गालबोट; धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा..

संपूर्ण राज्यात धुळवड साजरी होत असताना पुण्यात मात्र सणाला गालबोट लागलं आहे. धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसंत एकमेकांचा पाठलाग करत तरुणांकडून दगडफेकही करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे ही घटना घडली.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही काही कारणास्तव भांडण झालं. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही. मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत तरुणांचा एक गट दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. तसंच रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोडही करत आहेत. यानंतर समोरील गटातील तरुण हातात काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत. या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे.
सदर घटनेचा अधिक तपास चतुःशृंगी पोलिस करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages