😱 पुण्यात ४१ वर्षीय अंगणवाडी सेवेकेची कोरोना टेस्ट पॉसीटीव्ह; महिलेच्या संपर्कात आलेल्या ८७ जणांना क्वारंटाईन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 23, 2020

😱 पुण्यात ४१ वर्षीय अंगणवाडी सेवेकेची कोरोना टेस्ट पॉसीटीव्ह; महिलेच्या संपर्कात आलेल्या ८७ जणांना क्वारंटाईन..


😱 पुण्यात ४१ वर्षीय अंगणवाडी सेवेकेची कोरोना टेस्ट पॉसीटीव्ह; महिलेच्या संपर्कात आलेल्या ८७ जणांना क्वारंटाईन..

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या ४१ वर्षीय अंगणवाडी सेवेकेची कोरोना टेस्ट पॉसीटीव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या ८७ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून इतरांचा शोध सुरु आहे. याबाबतच वृत्त ‘पुणे मिरर’ या वृत्तपत्राने दिल आहे.

या बाबत माहिती अशी की पुण्यातील या अंगणवाडी सेविकेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसू लागली त्यावर महिलेने घरघुती उपाय आणि काही औषध घेतली. या काळात या अंगणवाडी सेवेकेने जवळपास १२ गावांना भेट दिली तसेच वाशी यथे एका लग्नालाही ती गेली. या लग्नात जवळपास १५०० लोकांनी हजेरी लावली होती.

महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं काळातच प्रशासनाने वेगवान पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचार्यांनी सदर १२ गावं अक्षरशः पिंजून काढले आहेत आणि महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याकडून अधिक व्यापक कारवाई सुरु केली आहे. प्रशासनाने सदर महिलेच्या ३ मार्च ते हॉस्पिटलमध्ये भरती केल्यार्यंतच्या प्रवास आणि भेटी गाठीची माहिती घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ६ मार्च रोजी सदर महिला राहत असलेल्या सिंहगड रोड येथून वेल्हा येथे बैठकीसाठी गेली, त्यानंतर तिला काही लक्षण दिसू लागले यावर तिने पुढचे २ दिवस घरीच थांबण्याचं ठरवलं. पाण्याच्या गुळण्या करणे अश्या घरघुती उपायांचा फरक न पडल्याने महिलेने स्थानिक डॉक्टरकडे इलाज घेतला. यावेळी सदर महिला दवाखान्यातील इतर रुग्णांच्या संपर्कात आली असण्याची शक्यता आहे.

सदर महिलेला बर वाटू लागल्याने तिने पुढील काही दिवस वेल्हा येथे कामावर जाऊन अनेक लोकांची भेट घेतली. त्यानंतर ती पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाऊन आली अशीही माहिती आहे. अखेर १६ मार्चला सदर महिलेला जगताप हॉस्पिटल आणि नंतर भारती हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलं. येथे महिलेची H1N1 चाचणी निगेटीव्ह आली परंतु NIV ने सदर महिलेची कोरोना टेस्ट पॉसीटीव्ह असल्याच म्हटलं आहे.

आता प्रशासनाने महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वाची तपासणी सुरु केली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यास सुरवात केली आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोणातही कोरोनाची लक्षणं दिसून आलेली नाहीत तरीही प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे. याबाबतची कारवाई रविवार रात्रीपर्यंत सुरु होती.

Post Bottom Ad

#

Pages