📱व्हॉटसअॅपने एका फीचरमध्ये मोठा बदल करत भारतीय युजर्सवर आणले निर्बंध.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 30, 2020

📱व्हॉटसअॅपने एका फीचरमध्ये मोठा बदल करत भारतीय युजर्सवर आणले निर्बंध..


📱 व्हॉटसअॅपने एका फीचरमध्ये मोठा बदल करत भारतीय युजर्सवर आणले निर्बंध..

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामुळं लोक घरातचं बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत जगाशी संपर्क साधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. याचा परिणाम इंटरनेट स्पीडवर होत आहे. इंटरनेटवर वाढलेला लोड कमी करण्यासाठी युट्यूब, नेटफ्लिक्स यांसह अनेक वेबसाइटनं बिटरेट आणि कमी रिझोल्यूशनमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, व्हॉटसअॅपनेही त्यांच्या एका फीचरमध्ये मोठा बदल केला आहे. भारतीय युजर्सवर हे निर्बंध असून आता स्टेटसला फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.

WABetaInfo ने व्हॉटसअॅपमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली आहे. यामुळे युजर्सना 15 सेकंदापेक्षा जास्त वेळेचा व्हिडिओ स्टेटसला शेअर करता येणार नाही. याआधी स्टेटसला 30 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ ठेवता येत होता. जर तुम्ही मोठा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलात तर त्यापूर्वी एक नोटिफिकेशन येतं. माय स्टेटसला पाठवण्यात येणारे व्हिडिओ पहिल्या 15 सेकंदापर्यंत ट्रिम केले जातील.

याआधी जेव्हा व्हिडिओ स्टेटसला ठेवता यायचा तेव्हा व्हिडिओतील हवा तेवढा भाग पोस्ट करता येत होता. मात्र आता कोणताही व्हिडिओ पोस्ट केलात तरी त्याचे फक्त 15 सेकंदच दिसतील.

सर्व्हरवर येणारा लोड कमी करण्याच्या दृष्टीने 15 सेकंदाच्या व्हिडिओ स्टेटसचं पाउल उचलण्यात आलं आहे. यानंतर अद्याप व्हॉटसअॅपने अधिकृत काही सांगितलेलं नाही. मात्र सध्याच्या या बदलामुळे युजर्स नाराज आहेत. आधीच 30 सेकंदाची मर्यादा असताना त्यात आणखी घट केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages