🚩 पुण्यात गुरूवार दि.१२ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी वाहतूकीत बदल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 11, 2020

🚩 पुण्यात गुरूवार दि.१२ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी वाहतूकीत बदल..


🚩 पुण्यात गुरूवार दि.१२ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी वाहतूकीत बदल..

गुरूवार दि.१२ मार्च २०२० रोजी तिथी प्रमाणे श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पुणे शहरात विविध संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूकी दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने पायी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर -
३७/टिआरए-२,दिनांक-२७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६(१) (ए)
(बी),११६(४) आणि ११७ अन्वये प्रमाणे अपर पोलीस आयुक्त वाहतुक शाखा पुणे शहर डॉ.संजय शिंदे अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा.फायरब्रिगेड,पोलीस वाहने,रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन आवश्यकत्तेप्रमाणे खालील मिरवणूक मार्गावरील वाहतुक बंद/डायव्हर्शन बाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

१) मुख्य मिरवणूक मार्ग :
भवानी माता मंदीर, भवानी पेठ येथून सुरु होवुन रामोशी गेट चौक - नेहरु रोडने - ए.डी.कॅम्प चौक - संत कबीर चौक - नानाचावडी चौक - अरुणा चौक - नानापेठ चौकी - अल्पना टॉकिज - डुल्या मारुती
चौक - हमजेखान चौक - सतरंजीवाला चौक - तांबोळी मशिद चौक - सोन्या मारुती चौक - मोती चौक - फडके हौद चौक - जिजामाता चौक - लालमहल चौक पुणे येथे विसर्जन होणार आहे .

२) मुख्य मिरवणुक मार्ग डायव्हर्शन :
१) अ) नेहरू रोड वरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊस कडुन सेव्हन लव्हज कडे जाणा-यांनी कादर चौक - क्वार्टर गेट चौक - जुना मोटार स्टॅन्ड मार्गे जावे किंवा पॉवर हाऊस ते समर्थ पोलीस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करुन जुना मोटर स्टॅडकडे जावे .
ब) तसेच सेव्हन लव्हज चौका कडुन पॉवर हाऊस कडे जाणा-यांनी बाहुबली चौक राजसबाई गंगाळे पथ - मार्गे जुना मोटार स्टॅन्ड - क्वार्टर गेट मार्गे जावे .

२) अ) लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणा-यांनी नेहरू रोड - पॉवर हाऊस चौक - अपोलो टॉकीज - फडके हौद - जिजामाता चौक मार्गे जावे .
ब) तसेच देवजी बाबा चौकाकडुन मिठगंज चौक मार्गे स्वारगेट कडे जाणा-यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पूल ते अपोलो सिनेमा ते पॉवर हाऊस चौकातुन नेहरू रोडचा वापर करावा.

३) अ) गणेश रोडवरील वाहतूक बंद केल्या नंतर जिजामाता चौकाकडे जाणा-यांनी देवजी बाबा चौक - हमजेखान चौक व लक्ष्मी रोडचा वापर करावा .
ब) जिजामाता चौकातून फडके हौद चौकाकडे जाणा-यांनी गाडगीळ पुतळा - कुंभार वेस मार्गे किंवा बुधवार चौक - पासोडया विठोबा चौक - मोती चौक - फडके हौद मार्गे जावे .

४) अ) गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक दरम्यान वाहतूक बंद केल्यानंतर स्वारगेटकडे जाऊ इच्छिणा-यांनी कुंभारवेस - शाहिरअमर शेख चौक - मालधक्का चौक - नेहरू रोडने स्वारगेटला जावे .
मिरवणूकीचे मार्गावर वाहन चालकांनी येणे-जाणेचे टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा. मिरवणूक पुढे जाईल तस-तशी वाहतूक पुर्ववत करण्यात येईल.

◾ याखेरीज नमूद मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी करण्यात येत आहे.
◾तसेच मिरवणूका जाणारे मुख्य रस्त्यास मिळणा-या लहान रस्त्यांवर व गल्ली बोळात मुख्य रस्त्याचे तोंडापासून १०० फूट अंतरापर्यन्त वाहने उभी करण्यास बंदी करण्यात येत आहे.

मुख्य मिरवणूकी व्यतिरिक्त पुणे शहरात लष्कर,खडकी या भागांत तसेच इतर भागात छोटया - मोठया मिरवणूका निघणार आहेत.

१) लष्कर भागातील मिरणूक - मिरवणूक मार्ग - खान्या मारुती चौक येथून सुरु होऊन ट्रायलक हॉटेल चौक - न्यु मोदीखाना मार्ग मुफ्तीचौक चौक - उजवीकडे वळून कुरेशी मशिद - सेट्रल स्ट्रीटने भोपळे चौक - सेट्रल स्ट्रीट चौकी - आसुडखान चौक येथे विसर्जन.

लष्कर भागातील मिरवणुक मार्ग डायव्हर्शन :
१) गोळीबार मैदाण चौकाकडून एम जी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन येथे बंद करुन ती खाणे मारुती चौकाकडे वळून ती वाहतुक सोलापूर रोड तसेच ईस्ट्रीट रोडने वळविण्यात येणार आहे.
२) कोहीनूर हॉटेल चौकाकडून आर एस केदारी रोडने जाणारी वाहतुक बंद करुन सदरची वाहतुक ही एम जी रोडने महावीर चौकाकडे सोडण्यात येईल.
३) महावीर चौकाकडून सेंट्रल स्ट्रिट चौकीडे जाणारी वाहतुक बंद करुन सदरची वाहतुक ही एमजी रोडने नाझ चौकाकडे सोडण्यात येईल.

२) खडकी भागातील मिरवणूक मार्ग :
शिवाजी पुतळा - खडकी बाजार येथुन सुरु होवुन कॅन्टोमेंट हॉस्पीटल चौक - श्रीराम मंदीर - आसुरखाना चौक - हुले रोडने - नवी तालिम चौक - गोपी चौक - आंबेडकर चौक - क्राऊन हॉटेल चौक - टिकारा चौक - डी.आर गांधी चौक - महाराष्ट्र बैंक मार्गे शिवाजीपुतळा येथे विसर्जीत होणार आहे .

अपर पोलीस आयुक्त वाहतुक पुणे शहर डॉ.संजय शिंदे यांचे पुणेकरांना आव्हान..
पुणे शहरात वाहतूकीतील बदल हा गुरुवार दि.१२ मार्च रोजी आवश्यकतेप्रमाणे सुरु झाल्यापासून ते मिरवणूका संपेपर्यन्त मर्यादित राहिल. जस-जशी मिरवणूक पुढे जाईल तस-तशी मागील रस्त्यांवरील वाहतूक
पूर्ववत करण्यात येईल. तरी नागरिकांनी व वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, असे आव्हान अपर पोलीस आयुक्त वाहतुक
पुणे शहर डॉ.संजय शिंदे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages