😱 दहावीचा मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 4, 2020

😱 दहावीचा मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल..


😱 दहावीचा मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुहाकाकोडा येथे घडला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल झाली होती. 
कुहाकाकोडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्यामुळं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल झाली. काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एक तरुण व्हाट्सएपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधत असताना हा प्रकार उजेडात आला. शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाचा गवगवा करण्यात येत असताना हा प्रकार घडल्याने परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित केंद्र संचालक तसंच, पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाNयांनी दिली आहे. 🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..

Post Bottom Ad

#

Pages