😱 सीआयडीची वेबसाइट शुक्रवारी हॅक - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 7, 2020

😱 सीआयडीची वेबसाइट शुक्रवारी हॅक

😱 सीआयडीची वेबसाइट शुक्रवारी हॅक..

महाराष्ट्र सीआयडीची वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. लिजन नावाच्या एका ग्रुपने वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. दिल्ली हिंसाचाराचा हा बदला असल्याचे या ग्रुपकडून सांगण्यात आले आहे.

हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे. ही वेबसाइट हॅक करणारे कोण आहेत हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लवकरच हे स्पष्ट होईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतात मुस्लिम कुटुंबांना हिंदू जमावाकडून ठार मारण्यात येत आहे. शेकडो मुस्लिमांनी त्यांचे नातेवाईक गमावले आहेत. मुस्लिमांविरोधात निर्माण झालेल्या द्वेषाला मोदी सरकार कारणीभूत आहे, असे हॅकर्सनी लिहिले होते.

दरम्यान, दिल्ली हिंसाचारात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. 150 पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले.

Post Bottom Ad

#

Pages