😱 पुण्यात दोन चोरट्यांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 5, 2020

😱 पुण्यात दोन चोरट्यांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले..


😱 पुण्यात दोन चोरट्यांनी महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले..

पुणे शहरात कात्रज कोंढवा रोड पुना बेकरी जवळ ५६ वर्षीय महिला हया त्यांचे बहीणीसह पायी जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळयातील ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून तोडुन चोरून नेल्याची घटना घडली आहे. याघटने प्रकरणी ५६ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुण्यात मंगळवार दि.०३ मार्च २०२० रोजी दुपारी ०४.४५ वाजण्याच्या सुमारास कात्रज कोंढवा रोड पुना बेकरी जवळ,पुणे येथे फिर्यादी हया त्यांचे बहीणीसह पायी जात असताना मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ येवुन फिर्यादी यांच्या गळयातील ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण  जबरदस्तीने हिसका मारून तोडुन चोरून नेले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एका ५६ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण चोरुन नेलेल्या तक्रारीनुसार गुरनं.कलम २२९/२०२०,भादविक ३९२,३४
प्रमाणे मोटार सायकलवरील दोन अनोळखी चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढिल तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम.डी.पाटील करत आहेत. 🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..

Post Bottom Ad

#

Pages