😱 धक्कादायक..गावाला येत नाही याकारणावरून पतीने पत्नीवर रॉकेल ओतुन दिले पेटवून; आरोपी पतीला कोंढवा पोलिसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 21, 2020

😱 धक्कादायक..गावाला येत नाही याकारणावरून पतीने पत्नीवर रॉकेल ओतुन दिले पेटवून; आरोपी पतीला कोंढवा पोलिसांनी केली अटक..

😱 धक्कादायक..गावाला येत नाही याकारणावरून पतीने पत्नीवर रॉकेल ओतुन दिले पेटवून; आरोपी पतीला कोंढवा पोलिसांनी केली अटक..

पुणे शहरातील गोकुळनगर कोंढवा बुद्रुक परिसरात राहणाऱ्या पतीची नोकरी गेल्याने पती-पत्नीत सतत वाद होत असत त्यामुळे पती हा पत्नीला सतत आपण गावी जाऊ आणि तेथेच कायम स्वरूपी राहूयात असे म्हणत यास पत्नीने नकार दिल्याने पतीने रागाने चिडून जाऊन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन पत्नीला पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ०७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याघटने प्रकरणी पत्नी सौ.चागुणा जोगदंड यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाप्रकरणी आरोपी पती हारदास गंगाराम जोगदंड (वय २५, रा.गोकुळनगर गल्ली नं.३,कोंढवा बुद्रुक,पुणे. मूळगाव :- पो.गोर,ता.पुर्णी, जिल्हा परभणी) याला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गु.र.न.कलम २४५/२०२० भा.द.वि.कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी सौ.चागुणा जोगदंड (वय २२, रा गोकुळनगर गल्ली न.३,कोंढवा बुद्रुक,पुणे मुळगाव :- मु.पो मुरबा,ता.वसमत,जिल्हा हिंगोली) यांचे पती हारदास गगाराम जोगदंड (वय २५, रा.गोकुळनगर गल्ली नं.३,कोंढवा बुद्रुक,पुणे. मूळगाव :- पो.गोर,ता.पुर्णी, जिल्हा परभणी) हे दोघे काहि महिन्यापूर्वी लग्न करून पुण्यात कोंढवा बुद्रुक येथे राहण्यास आले होते. पती हारदास जोगदंड हे कोंढवा परिसरातील पेट्रोल पंपावर नोकर करत होते तर पत्नी ही डि.मार्ट याठिकाणी प्रमोटर्स म्हणून नोकरी करत होती. या पती-पत्नीचा सुखी संसार सुरू होता. कालांतराने पती यांची नोकरी सुटल्याने पत्नीच्या नोकरीवरच संसार सुरू होता. बुधवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ०७.३० वाजण्याच्या सुमारास रहात्या घरी पती हा पत्नीला सतत आपण गावी जाऊ आणि तेथेच कायम स्वरूपी राहून उदर निर्वाह करुयात असे म्हणत यास पत्नीने नकार दिल्याने पती व पत्नी यांच्यात बाचाबाची झाली असता पती हारदास जोगदंड यांने रागाने चिडून जाऊन पत्नीच्या अंगावर घरात असलेल्या रॉकेलच्या बाटलीतील रॉकेल ओतुन पत्नीला पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याघटनेची माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांना मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी गंभीर स्वरूपात जखमी झालेली पत्नी सौ.चागुणा जोगदंड यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पत्नीची प्रकृती खुपच गंभीर आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी आरोपी पती हारदास गंगाराम जोगदंड याला ताब्यात घेत त्याच्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गु.र.न.कलम २४५/२०२० भा.द.वि.कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.पोलीस उप-निरीक्षक श्री.निलेश चव्हाण करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages