📰 घरी येणारं वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित..वृत्तपत्रांमुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका ही अफवा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 24, 2020

📰 घरी येणारं वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित..वृत्तपत्रांमुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका ही अफवा..


📰 घरी येणारं वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित..वृत्तपत्रांमुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका ही अफवा.. 

करोना व्हायरस संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. देशातील २३ राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनतेला सावध राहून स्वतःची काळजी घरी राहून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लोकांना घरातच राहण्यासही सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना देशासह जगभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी टिव्ही आणि वृत्तपत्र हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. अशातच लोकांमध्ये एक अफवा पसरली होती की, वृत्तपत्रांमुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननेदेखील ही बाब फेटाळून लावली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने सांगितल्यानुसार, एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

वृत्तपत्रामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होत नाही..
दरम्यान, देशावर करोनाचं सावट असतानाच अनेक गोष्टींपासून लांब राहण्यास सांगण्यात येत आहे. अशातच अनेकजण हाताळत असलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातोय. वृत्तपत्र अनेकजण हाताळतात त्यामुळे त्यापासून लांब राहा. लायब्ररी किंवा सोसायटीमध्ये अनेक लोक पुस्तकं, मासिकं हाताळतात. त्यामुळे वृत्तपत्रं, मासिकांपासून लांब राहा. तसेच असं करत असाल तर आपले हात तत्काळ स्वच्छ करा, अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. परंतु, हा गैरसमज असून तुमच्या घरी येणारं वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. एवढचं नाहीतर वृत्तपत्र छापण्याच्या प्रक्रियेत कर्मचारीही काळजी घेत आहेत. वृत्तपत्र सॅनिटाइज केल्यानंतरच प्रेसमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवलं जात आहे. तसेच वृत्तपत्रांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. त्यामुळे वृत्तपत्रामुळे करोना व्हायरस पसरत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तुम्ही बिनधास्त वृत्तपत्र वाचू शकता.
अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार, वृत्तपत्रामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होत नाही. संस्थेने सांगितलं की, वृत्तपत्रामुळे करोनाचा व्हायरस पसरणे अशक्य आहे.

२० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुवा..
WHO ने सांगितल्या नुसार, करोनापासून बचाव करण्यासाठी सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींचं लोकांनी पालन करावं. जवळपास २० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. एवढचं नाहीतर लोकांना घरातच राहण्याचा सल्लाही दिला आहे.

Post Bottom Ad

#

Pages