🚳 पुण्यात सोमवार दि.२३ मार्च दुपारी ३ वाजल्यापासून मोटर व्हेइकल कायद्याची अंमलबजावणी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 24, 2020

🚳 पुण्यात सोमवार दि.२३ मार्च दुपारी ३ वाजल्यापासून मोटर व्हेइकल कायद्याची अंमलबजावणी..

🚳 पुण्यात सोमवार दि.२३ मार्च दुपारी ३ वाजल्यापासून मोटर व्हेइकल कायद्याची अंमलबजावणी..

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस मा.पोलीस सहआयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी मनाई केली आहे. सोमवार (दि.२३) दुपारी ३ वाजेपासून ते ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत बंदीचे आदेश लागू राहणार आहेत.
करोना आजार संसर्गजन्य असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पुणे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पोलीस सह आयुक्तांनी मनाई केली आहे. रहिवासी, अभ्यागत व वारंवार कामानिमित्त शहरात येणाऱ्याना ही बंदी असणार आहे.

पुणे शहरातील कोणत्याही रस्त्यांवर व गल्लोगल्ली या ठिकाणी सायकल, दुचाकी, तीनचाकी, कारसह इतर वाहने प्रवास व अवजड वाहतुकीस मनाई असणार आहे. आदेशानुसार खासगी वाहने, रिक्षा, वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

रुग्णालयात जाण्यासाठी परवानगी..
अत्यावश्यक प्रसंगी, रुग्ण तपासणी किंवा रुग्णालयात जाण्यासाठी कार, रिक्षा, इतर प्रवासी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

बंदी नसणारी वाहने..
बंदी आदेश रुग्णवाहिका, पोलीस वाहने, जीवणावश्यक वस्तू व सेवा वाहतूक करणारी वाहने, डॉक्टर व परामेडिकल कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.


Post Bottom Ad

#

Pages