😱 पुण्यात आयडीया कंपनीच्या कामगाराचे पीएफ खाते उघडण्याचा बहाणाकरत एकूण ४६ लाख ५१ हजार ५०० रुपये रक्कमेचा केला अपहार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 3, 2020

😱 पुण्यात आयडीया कंपनीच्या कामगाराचे पीएफ खाते उघडण्याचा बहाणाकरत एकूण ४६ लाख ५१ हजार ५०० रुपये रक्कमेचा केला अपहार..


😱 पुण्यात आयडीया कंपनीच्या कामगाराचे पीएफ खाते उघडण्याचा बहाणाकरत एकूण ४६ लाख ५१ हजार ५०० रुपये रक्कमेचा केला अपहार..

पुणे शहरात दिनांक ०७ सप्टेंबर २०१२ ते दिनांक ०४ जुलै २०१४ या कालावधीमध्ये एपीएम कंपनीने आयडीया सेल्युलर कंपनीला पुरविलेल्या कामगाराची पीएफची रक्कम घेवुन त्याचे पीएफ खाते न उघडता कामगारांचे एकूण ४६ लाख ५१ हजार ५०० रुपये रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुनिल लक्ष्मण रणधिर (वय ४५) वोडाफोन आयडीया लि. कंपनीचे अॅडमिन मैनेजर यांनी कामगाराची फसवणुक करणाऱ्या एपीएम ग्रुप कंपनीचे मालक/ भागीदार निलेश झाडबुके ऊर्फ निग्गाप्पा नागनाथ झाडबुके यांच्याविरुध्द डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दिनांक ०७ सप्टेंबर २०१२ रोजी आयडीया सेल्युलर लि. या कंपनीचे वतीने एपीएम ग्रुप कंपनी (ओमकार कॉम्पलेक्स,आंबेडकर चौक,औध,पुणे) या कंपनीचे मालक/ भागीदार निलेश ऊर्फ निग्गाप्पा नागनाथ झाडबुके (रा.पुणे) यांचा आयडीया सेल्युलर लि. कंपनी सोबत कामगार पुरविण्या संदर्भात करार करण्यात झाला होता. या कराराप्रमाणे आयडीया सेल्युलर लि. पुरविलेल्या कामगारांचे पगार, प्रोव्हीडंड फड (पीएफ) खाते उघडणे, ग्रॅच्युयिटी, ईएसआयसी, बोनस हे देणे, हे सर्व जबाबदारी एपीएम ग्रुप कंपनीने घेत त्याबाबत दिनांक ०७ सप्टेंबर २०१२ रोजी अंग्रीमेंट करण्यात आलेले होते. सदरचा करार हा दिनांक ०१ ऑगस्ट २०१२ ते दिनांक ३१ मार्च २०१३ एक वर्ष कालावधी करीता होता. एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्याचे नुतनीकरण करुन तो दिनांक २८ मार्च २०१३ रोजी पुन्हा एक वर्ष कालावधी वाढविण्यात आलेला होता. त्यांची दिनांक ०१ एप्रील २०१३ ते दिनांक ३१ मार्च २०१४ पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली होती. कराराप्रमाणे एपीएम ग्रुप कंपनीचे मालक निलेश झाडबुके हे दर महीन्याला सव्हीस चार्जचे बिल आयडीया सेल्युलर लि.कंपनीला पाठवून एपीएम ग्रुप कंपनीच्या इडसइंड बैंक खाते क्रमांक ०२३३ बी.एम.२४५६०५० शाखा हिंजेवाडी पुणे त्याचा आयएफएफसी कोड आयएनडीडी ००००२३३ यावर पाठवित होतो.

सन २०१४ एपीएम ग्रुप कंपनीने पुरविलेल्या कामगारापैकी काही कामगार काम सोडुन गेलेले होते त्या कामगाराना एपीएम ग्रुप कंपनीने पीएफच्या रकमेचा परतावा करण्याकरीता चेक दिलेले होते ते चेक रकमे अभावी बाऊस झाल्याने काही कामगार पीएफची रक्कम मागण्याकरीता आयडीया सेल्युलर लि. कंपनीकडे आल्यानंतर आयडीया सेल्युलर कंपनीच्यावतीने पीएफ ऑफीस याठिकाणी जावुन खात्री केली असता एपीएम ग्रुप कंपनीने आयडीया सेल्युलर कंपनीला पुरविलेल्या कामगाराचे कोणतेही पीएफ खाते उघडले नसल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानुसार आयडीया सेल्युलर कंपनीने एपीएम कंपनीकडे त्याबाबत खुलासा करण्याकरीता एपीएम ग्रुप कंपनीच्या (ओमकार कॉम्पलेक्स,आंबेडकर चौक,आँध,पुणे) ऑफीसमध्ये गेले असता कंपनीचे ऑफीस १० दिवसापासुन बंद असल्याची माहीती मिळाली. त्यांनतर आयडीया सेल्युलर कंपनीने सदर ऑफीसच्या ठिकाणी व आजुबाजुला जावुन वारंवार पाहीणी केली असता एपीएम ग्रुप कंपनीचे ऑफीस बंद असल्याचे आढळुन आले.

दरम्यान, दिनांक ०७ सप्टेंबर २०१२ ते दिनांक ०४/०७/२०१४ या कालावधीमध्ये एपीएम कंपनीने आयडीया सेल्युलर कंपनीला पुरविलेल्या कामगाराची पीएफची रक्कम घेवुन त्याचे पीएफ खाते न उघडता कामगारांचे एकूण ४६ लाख ५१ हजार ५०० रुपये रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केलेली आहे. तसेच आयडीया सेल्युलर कंपनीकडून कामगारांची पी.एफ रक्कम घेत कामगाराच्या पी.एफ खात्यामध्ये जमा न करता आयडीया सेल्युलर कंपनीच्या कामगारांची देखील फसवणुक केलेली आहे याप्रकरणी एपीएम ग्रुप कंपनी व कंपनीचे मालक/ भागीदार निलेश झाडबुके ऊर्फ निग्गाप्पा नागनाथ झाडयुके यांचेविरुध्द सुनिल लक्ष्मण रणधिर (वोडाफोन आयडीया लि. कंपनीचे अॅडमिन मैनेजर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सदर घटनेप्रकरणी डेक्कन पोलीस तपास करत आहेत. 🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..

Post Bottom Ad

#

Pages