🚨 पुण्यात बनावट हँड सेनिटायझर्स कारखाना गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाने केला उध्वस्त; ६ जणांना अटक करत २७ लाख रुपयाचे बनावट सेनिटायझर्स व मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 17, 2020

🚨 पुण्यात बनावट हँड सेनिटायझर्स कारखाना गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाने केला उध्वस्त; ६ जणांना अटक करत २७ लाख रुपयाचे बनावट सेनिटायझर्स व मुद्देमाल जप्त..


🚨 पुण्यात बनावट हँड सेनिटायझर्स कारखाना गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाने केला उध्वस्त ; ६ जणांना अटक करत २७ लाख रुपयाचे बनावट सेनिटायझर्स मुद्देमाल जप्त..

करोना व्हायरसची समाजामध्ये भिती व त्यामुळे समाजातुन सॅनिटायझर्सची वाढलेली मागणी यागोष्टीचा फायदा उचलुन सर्व सामान्या जनतेच्या आरोग्यास घातक असे शासन व प्रशासनाची कोणतेही मान्यता नसताना बनावट सॅनिटायझर्स बनवुन त्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पुणे शहर गुन्हे शाखेचे मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे यांना मिळताच त्यांनी याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ५ चे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केल्यानुसार गुन्हे शाखा युनिट ५ चे तपास पथकाने पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये बनावट सनिटायझर्स बनवणारा कारखाना सिल करुन २७ लाख रुपयाचे बनावट हँड सेनिटायझर्स व त्याकामी लागणारे साहित्य जप्त करुन उघडकीस आणत ०६ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक श्री.आतिष सरकाळे (वय 39, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

बनावट हँड सेनिटायझर्स बनवणारे व विक्री करणारे आरोपी
१) कुणाल ऊर्फ सोनु शांतीलाल जैन (वय ३३, रा. पार्श्वनगर सोसायटी, व्ही.आय.टी कॉलेज जवळ,कोढवा बुद्रुक,पुणे),
२) चेतन माधव भोई (वय-२६, रा.गंगाधाम फेज -१ फ्लॅटमध्ये भाडयाने, गंगाधाम मार्केटयार्ड,पुणे मुळ गाव मु.पो.फैजपुर ता.यावल जि.जळगाव),
३) इरफान इक्बाल शेख (वय ३२, रा.सुर्मा रेसीडेन्सी,कोढवा खुर्द,पुणे),
४) आसीम आरिफ मनियार (वय २७, रा.युनिटी टॉवर,भाग्योदयनगर,कोंढवा,पुणे),
५) स्वप्नील शिवाजी शिंदे (वय ३१, रा.सदाशिव पेठ, पुणे ३०),
६) महेश रामचंद्र टेंबेकर (वय ३१, रा.कमला हेरीटेज, पुणे सातारा रोड, पुणे) यांना गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी ताब्यात घेत बनावट सनिटायझर्स बनवणारा कारखाना सिल करुन २७ लाख रुपयाचे बनावट हँड सेनिटायझर्स व त्याकामी लागणारे साहित्य जप्त करुन त्यांच्या विरुध्द मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.९/२०२० भा.दं.वि.स. कलम २७६, ३३६, ४२०, ३४ व औषधे व सौदर्य प्रसाधन कायदा १९४० कलम १८(अ), १८(क), २२(१)(क.क.अ) व २८, २७(ब)(२), २७(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,
पुणे शहर गुन्हे शाखेचे मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे यांनी शनिवार दि.१५ मार्च २०२० रोजी त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन परीसरात एक इसम बनावट सनिटायझर्स विक्रीकरीता व्यापायांना डिलीव्हरी देण्याकरीता येत असल्याची माहिती मिळाली. मिळालेली गुप्त माहिती त्यांनी युनिट ५ चे प्रभारी अधिकारी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ता चव्हाण यांना देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही करण्याकामी मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन टिमने मार्केटयार्ड भागामध्ये सापळा रचून रविवार दि.१५ मार्च २०२० रोजी रात्री १०.३० वा. दरम्यान पोलीस उपानिरीक्षक श्री. सोमनाथ शेडगे व पथकातील पोलीस कर्मचारी यांनी संशयित इसम १) कुणाल ऊर्फ सोनु शांतीलाल जैन (वय ३३, रा. पार्श्वनगर सोसायटी, व्ही.आय.टी कॉलेज जवळ,कोढवा बुद्रुक,पुणे) व त्याचा
साथीदार २) चेतन माधव भोई (वय-२६, रा.गंगाधाम फेज -१ फ्लॅटमध्ये भाडयाने, गंगाधाम मार्केटयार्ड,पुणे मुळ गाव मु.पो.फैजपुर ता.यावल जि.जळगाव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बनावट हँड सेनिटायझर्स जप्त करुन कायदेशीर कारवाई कामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्या विरुध्द गु.र.नं.९/२०२० भा.दं.वि.स. कलम २७६, ३३६, ४२०, ३४ व औषधे व सौदर्य प्रसाधन कायदा १९४० कलम १८(अ), १८(क), २२(१)(क,क,अ) व २८, २७(ब)(२), २७(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपी बनावट हँड सेनिटायझर्स मेडीसन सप्लायरच्या मदतीने विक्री करीत असल्याची कबूली दिली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-५ मधील अधिकारी व कर्मचारी यांनी मेडीसन सप्लायर १) इरफान इक्बाल शेख (वय ३२, रा.सुर्मा रेसीडेन्सी,कोढवा खुर्द,पुणे),
२) आसीम आरिफ मनियार (वय २७, रा.युनिटी टॉवर,भाग्योदयनगर,कोंढवा,पुणे),
३) स्वप्नील शिवाजी शिंदे (वय ३१, रा.सदाशिव पेठ, पुणे ३०),
४) महेश रामचंद्र टेंबेकर (वय ३१, रा.कमला हेरीटेज, पुणे सातारा रोड, पुणे) या आरोपींना दाखल गुन्हयात अटक केली आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपीकडून एकुण २७ लाख रुपयाचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर्स व त्याकामी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये कुणाल जैन, चेतन भोई, इरफान शेख, आसीम मनियार हे आरोपी मार्केटमध्ये बनावट सॅनिटायझर्स बाजारात विक्री करीत होते तर स्वप्नील शिंदे, महेश टेंबेकर हे आरोपी भागीदारी करुन स्वप्नील शिंदे याच्या मालकीच्या नवसहयाद्री सोसायटीच्या जागेमध्ये बनावट सॅनिटायझर्सचा कारखाना चालु असल्याचे गुन्हे शाखा युनिट ५ चे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगांवकर व तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. सहा आरोपींना मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
अटक केलेल्या सहा आरोपींना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर न्यायालय, पुणे यांच्या समक्ष हजर केले असता मा.न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा आरोपींना ०४ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. आरोपीकडुन जप्त केलेल्या बनावट सॅनिटायझर बाटल्यावर मेड इन नेपाळ व मेड इन तायवान असे लेबले लावले असुन ते पुणे शहर तसेच इतर जिल्हे तसेच बाहेरील राज्यात विक्री व मोठया प्रमाणात बनावट सॅनिटायझर्स सप्लाय केल्याचा संशय असुन त्या दृष्टीने गुन्हे शाखा युनिट ५ पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ,
मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. अशोक मोराळे ,
मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. बच्चन सिंह ,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे श्री. शिवाजी पवार ,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे श्री. विजय चौधरी ,
गुन्हे शाखा युनिट ५ चे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगांवकर , पोलीस उपनिरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे , पोलीस हवलदार श्री. दत्ता काटम , पोलीस हवलदार श्री. प्रविण शिंदे , पोलीस हवलदार श्री. भरत रणसिंग , पोलीस हवलदार श्री. अमजद पठाण , पोलीस हवलदार श्री. सचिन घोलप , पोलीस हवलदार श्री. महेश वाघमारे , पोलीस हवलदार श्री. प्रविण काळभोर , पोलीस हवलदार श्री. अश्रृबा मोराळे , पोलीस नाईक श्री. प्रमोद घाडगे , पोलीस शिपाई श्री. दया शेगर , पोलीस नाईक श्री. सतिश वणवे , पोलीस नाईक श्री. अंकुश जोगदंडे , पोलीस नाईक श्री. प्रमोद गायकवाड , पोलीस शिपाई श्री. संजय दळवी , महिला पोलीस शिपाई सौ. स्नेहल जाधव यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages