👌जनता कर्फ्युला पुण्यातील कोंढवामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 22, 2020

👌जनता कर्फ्युला पुण्यातील कोंढवामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद..


👌 जनता कर्फ्युला पुण्यातील कोंढवामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद..
पुणे शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी लागू केलेल्या 'जनता कर्फ्यु'ला सकाळपासून कोंढव्यातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे संपुर्ण कोंढवामध्ये नीरव शांतता होती. तर, या कर्फ्युच्या पार्श्‍वभुमीवर कोंढवा पोलिसांकडून सकाळपासूनच पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालण्यात येत होती. विशेषतः कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सकाळी ०७.०० वाजल्यापासूनच जनता कर्फ्युला सुरूवात झाली. बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी कोंढवा पोलिस सकाळी ०७.०० वाजल्यापासूनच गस्तीवर होते.

पुणेकरांचा जनता कर्फ्युला उत्स्फुर्त प्रतिसाद..
शहरामधील रस्ते, चौक शांत असतानाही बहुतांश ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांमध्ये थांबलेले चित्र दिसत होते. पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिस ठाण्यांच्या बीट मार्शलबरोबरच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारीही आपापल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. वस्त्यांमध्ये काही प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते.

Post Bottom Ad

#

Pages