😱 जुन्या कात्रज घाटात गुरुवारी सायंकाळी पीएमपी बस, एसटी बस आणि छोटा टेम्पो यांचा अपघात.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 6, 2020

😱 जुन्या कात्रज घाटात गुरुवारी सायंकाळी पीएमपी बस, एसटी बस आणि छोटा टेम्पो यांचा अपघात..

😱 जुन्या कात्रज घाटात गुरुवारी सायंकाळी पीएमपी बस, एसटी बस आणि छोटा टेम्पो यांचा अपघात..

जुन्या कात्रज घाटात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पीएमपी बस, एसटी बस आणि छोटा टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे कात्रज घाट रस्त्यावर दोन्ही बाजूला सुमारे एक तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटातून एक छोटा टेम्पो साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. घाट रस्त्यावरील एका वळणावर छोटा टेम्पोने एसटी बसला ओव्हरटेक करुन पुढे निघाला होता. यावेळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या पीएमपी बसची टेम्पोला समोरून धडक बसली. तर पाठीमागून येणाऱ्या एसटी बसची टेम्पोला पाठीमागून धडक बसली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; मात्र तीन वाहनांचे नुकसान झाले. तर तीन वाहनांचा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला. त्यामुळे कात्रज घाट रस्त्यावर दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना बराच वेळ या वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला घेतल्या नंतर सुमारे एक तासाने घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. याबाबत,भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्री.विष्णु पवार म्हणाले, "या अपघातात कोणाला दुखापत झालेली नाही. अपघातानंतर ताबडतोब घटनास्थळी जाऊन अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली आहे."


Post Bottom Ad

#

Pages