🚨 पुण्यात बनावट मास्कची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कंपनीचा गुन्हे शाखा युनिट १ ने केला पर्दाफाश; दोघांना अटक करत एकुण ४,३०,४४५/- रुपये किंमतीचे १७,८०५ मास्क जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 28, 2020

🚨 पुण्यात बनावट मास्कची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कंपनीचा गुन्हे शाखा युनिट १ ने केला पर्दाफाश; दोघांना अटक करत एकुण ४,३०,४४५/- रुपये किंमतीचे १७,८०५ मास्क जप्त..


🚨 पुण्यात बनावट मास्कची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कंपनीचा गुन्हे शाखा युनिट १ ने केला पर्दाफाश; दोघांना अटक करत एकुण ४,३०,४४५/- रुपये किंमतीचे १७,८०५ मास्क जप्त..

जगभराप्रमाणेच देशभर कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी सामान्य नागरीक सॅनिटायझर व मास्क मोठया प्रमाणात विकत घेत आहेत. त्यामुळे बाजारामध्ये त्याचा तुटवडा जाणवत आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी मोठी असल्याने सॅनिटायझर व मास्कची नामांकीत कंपनीच्या नावाने नकली व अप्रमाणीत विनापरवाना उत्पादन विक्री करुन तसेच वाजवी दरापेक्षा जास्त दराने विक्री करुन नफेखोरी करत असल्याची गोपणीय माहिती मा.अपर पोलीस आयुक्त श्री.मोराळे यांना मिळाताच त्यांनी गुन्हे शाखा पुणे युनिट १ ला कारवाईकामी आदेशीत केल्यानुसार गुन्हे शाखा पुणे युनिट १ च्या टिमने सोमवार पेठेतील नरपतगीरी चौकाजवळील होम लिंक इंटरप्रायझेस याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्रीशीर माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा टाकून होम लिंक इंटरप्रायझेसचा मालक व कामगार (ऑफीसबॉय) या दोघांना अटक करत त्यांच्याकडून एकुण ४,३०,४४५/- रुपये किंमतीचे १७,८०५ मास्क जप्त केले आहेत.

विविध प्रकारचे मास्क शासनाने विहीत केलेल्या दरांपेक्षा अधिक दराने विक्री करुन मोठया प्रमाणावर नफेखोरी करणारे आरोपी
१) मालक - भुपेश ओमप्रकाश गुप्ता (रा. पिंगळेवस्ती, गंगा हाईटस सी/१, मुंढवा रोड, पुणे),
२) ऑफीसबॉय - रोहन अजय शुक्ला (रा. पिंगळे वस्ती, मुंढवा रोड, सांडभोर
वस्ती, पुणे) यांना गुन्हे शाखा पुणे युनीट १ ने ताब्यात घेत त्यांच्या विरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२/२०२०, जीवनाश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ सह ७ व भादंविक-३४ अन्वये गुन्हा दाखल करत गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा पुणे युनीट १ च्या पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,
सध्या सर्व जगभराप्रमाणेच देशभर कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी सामान्य नागरीक सॅनिटायझर व मास्क मोठया प्रमाणात विकत घेत आहेत. त्यामुळे बाजारामध्ये त्याचा तुटवडा जाणवत आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी मोठी आहे. काही समाजीकशत्रु सॅनिटायझर व मास्कची नामांकीत ब्रँडच्या नावाने नकली व अप्रमाणीत विनापरवाना उत्पादन विक्री करुन तसेच वाजवी दरापेक्षा जास्त दराने विक्री करुन नफेखोरी करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे भारत सरकारने दि. १३ मार्च २०२० रोजी अन्वये प्रमाणे राजपत्रात प्रसीध्द केलेप्रमाणे मास्क व सॅनीटायझर यांचा आवश्यक वस्तु अधिनीयमांतर्गत वस्तुमध्ये दि. ३० जून २०२० पर्यंत समावेश केलेला आहे. तसेच दि. २१ मार्च २०२० रोजी प्रसीध्द केलेल्या नोटीफीकेशनद्वारे टू प्लाय व थ्री प्लाय मास्कच्या किंमती नियंत्रीत करण्यासाठी हे दर दि.१२ फेब्रुवारी २०२० रोजीच्या प्रचलीत दरापेक्षा जास्त असणार नाहीत असे निश्चित केलेले आहे, म्हणजेच हे दर थ्री प्लाय सर्जीकल मास्क हे रुपये १०/- प्रत्येकी पेक्षा व टू प्लाय मास्क हे रुपये ८/- प्रती पेक्षा अधिक असणार नाहीत असे निश्चित केलेले आहेत.

या अशंगाने अशा नफेखोर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचे वरीष्ठांचे आदेश आहेत. पुणे शहरामध्ये अशा इसमांचा शोध घेणेकामी माहिती काढत असताना गोपणीय बातमीदारामार्फत मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मोराळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सोमवार पेठेतील नरपतगीरी चौकाजवळील होम लिंक इंटरप्रायझेसचे मालक भूपेश गुप्ता हे विविध प्रकारचे मास्क शासनाने विहीत केलेल्या दरांपेक्षा अधिक दराने विक्री करुन मोठया प्रमाणावर नफेखोरी करत आहेत. त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरीष्ठांनी दिले. कारवाईमध्ये बनावट ग्राहक ३५६ सोमवार पेठ, पवित्र इन्क्लेव्ह लडकत पेट्रोल पंपासमोर पहिल्या मजल्यावरील होम लिंक एंटरप्रायजेस या ठिकाणी मास्क खरेदी करण्यासाठी पाठवून मालक भुपेश गुप्ता यांचेशी संपर्क साधला असता त्याने एन ९५ हा मास्क ५२/- रु प्रत्येकी, व टू प्लाय (थ्री लेयर हँडमेड व मशीन मेड) निळे, पांढरे व हिरव्या रंगाचे मास्क प्रत्येकी १४/- रु दराने मिळतील असे सांगीतले. तडजोडी अंती एन ९५ हा मास्क ५२/- रु प्रत्येक नग, पांढ-या रंगाचे गोल एन–९० मास्क प्रत्येकी २९/- रुपये व टू प्लाय (थ्री लेयर हँडमेड व मशीन मेड) निळे, पांढरे व हिरव्या रंगाचे प्रत्येकी ११/- रु दराने मिळतील असे सांगीतले. त्याने पुढे असेही सांगीतले की या मालाची डिलीव्हरी त्याचा माणुस रोहन शुक्ला हा देईल. त्याप्रमाणे रोहन याने संपर्क करुन गोडाऊन उघडून मास्क देत असतांना युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी अचानक छापा टाकून एकुण कि.रु ४,३०,४४५/- किंमतीचे १७,८०५ मास्क जप्त केले आहेत.

यातील आरोपी होम लिंक एंटरप्रायजेसचा मालक भुपेश ओमप्रकाश गुप्ता (रा. गंगा हाईटस, मुंढवा रोड पुणे) याच्या ३५६ सोमवार पेठ, पवित्र इन्क्लेव्ह, लडकत पेट्रोल पंपासमोर पहिल्या मजल्यावरील होम लिंक एंटरप्रायजेसचे कार्यालय व आसपासच्या गोडाउनच्या
झडतीमध्ये त्याने शासकीय आदेश पारीत झालेनंतरही अशा मालाचा साठा करुन स्वतःच्या अधिकच्या आर्थिक लाभासाठी, वाढीव दराने विविध मास्कची विक्री केलेचे मिळालेल्या पावत्यांवरून आढळून आल्याने १) भुपेश ओमप्रकाश गुप्ता (रा. पिंगळेवस्ती, गंगा हाईटस सी/१, मुंढवा रोड, पुणे) याच्याकडे काम करणारा कामगार (ऑफीसबॉय) २) रोहन अजय शुक्ला (रा. पिंगळे वस्ती, मुंढवा रोड, सांडभोर
वस्ती, पुणे) यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२/२०२०, जीवनाश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ सह ७ व भादंविक-३४ अन्वये गुन्हा दाखल करत गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.
समर्थ पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीना मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीना दि.२९ मार्च २०२० रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा पुणे युनीट १ चे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा. अपर पो.आयुक्त गुन्हे शाखा श्री. अशोक मोराळे , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा श्री. बच्चन सिंह , मा. सहा.पोलीस आयुक्त गुन्हे प्रतिबंधक श्री. शिवाजी पवार , मा. सहा.पोलीस आयुक्त गुन्हे अभियोग श्री.चौधरी यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शाखा पुणे युनीट १ चे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर , पोसई श्री. हनुमंत शिंदे , श्री. उत्तम बुदगुडे , पोलीस कर्मचारी श्री. बाबा चव्हाण , श्री. अनिल घाडगे , श्री. प्रकाश लोखंडे , श्री. योगेश जगताप , श्री. मल्लीकार्जून स्वामी , श्री. श्रीकांत वाघवले , श्री. इरफान मोमीन , श्री. सुभाष पिंगळे , श्री. रिजवान जिनेडी , श्री. सुधाकर माने , श्री. गजानन सोनुने , श्री. अजय थोरात , श्री. अमोल पवार , श्री. संजय बरकडे , श्री. सचिन जाधव , श्री. इम्रान शेख , श्री. तुषार खडके , श्री. अशोक माने , श्री. विजेसींग वसावे , श्री. प्रशांत गायकवाड , श्री. अजय जाधव , श्री. उमेश काटे , श्री. प्रविण जाधव , श्री. तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages