👊पत्रकारांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा इशारा; संबंधितांवर कारवाई करुन करा निलंबीत अन्यथा उतरतणार रस्त्यावर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 30, 2020

👊पत्रकारांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा इशारा; संबंधितांवर कारवाई करुन करा निलंबीत अन्यथा उतरतणार रस्त्यावर..


👊 पत्रकारांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा इशारा; संबंधितांवर कारवाई करुन करा निलंबीत अन्यथा उतरतणार रस्त्यावर..

कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र पोलिसांनी थेट पत्रकारांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हिंगोलीतील आयबीएन लोकमतचे पत्रकार श्री.कन्हैय्या खंडेलवाल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे औरंगाबाद येथील सोशल मीडिया प्रमुख श्री.मनोज जाधव यांचेसह टिटवाळा (जि.ठाणे) येथील पत्रकार श्री.राजू टपाल, बारामती येथील श्री.गोकूळ टांकसाळ, भद्रावती (जि.चंद्रपूर) येथील दैनिक भूमिपूत्रचे पत्रकार श्री.उमेश कांबळे तर लातुर येथिल पञकार श्री.नृसिंह घोणेे , बिड येथील पत्रकार श्री.मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तरी ,पोलीसांनी कायदे हातात घेवु नये व त्यांच्या वर कडक कारवाई करुन त्यांना निलंबीत करावे अन्यथा सर्व राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्य्यक्ष श्री.वसंत मुंडे व राज्य संघटक श्री.संजय भोकरे यांनी दिला आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्य गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपण पत्रकार असल्याचं हे सर्वच पोलिसांना सांगत असतानाही तसेच सोबतचं आयकार्ड दाखवून देखील पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण झाल्यानंतर संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत मात्र काही पोलिसांनी दादागिरी करत या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस व अधिकार्यांवर कडक कारवाई करुन त्यांना निलंबीत करावे अशी मागणी संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री.विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष श्री.राकेश टोळ्ये, कार्याध्यक्ष श्री.किरण जोशी, पुणे शहर अध्यक्ष श्री.नितिन बिबवे, पुणे शहर उपअध्यक्ष श्री.हर्षद कटारिया, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री.अजित गस्ते, पुणे शहर खजिनदार श्री.पंकज बिबवे, पुणे शहर संघटक सचिव श्री.भूषण गरुड, वृत्तवाहिनी संघाचे मुंबई अध्यक्ष श्री.रणधीर कांबळे, ग्रामीणचे अध्यक्ष श्री.मनिष केत, कोकण विभागीय अध्यक्ष श्री.भगवान चंदे, विदर्भ अध्यक्ष श्री.बाळासाहेब देशमुख, नागपुर विभागीय अध्यक्ष श्री.महेश पानसे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री.किशोर रायसाकडा, मंत्रालय संपर्क प्रमुख श्री.नितीन जाधव, मुंबई अध्यक्ष श्री.संजय माळवदे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव, विदर्भ उपाध्यक्ष श्री.संदीप पांडव, श्री.निलेश सोमाणी आदींनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages