👌पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मजूर, कामगार, बेघर असे मिळून आलेल्या १११५ लोकांनाची पोलीसांनी केली निवारा केंद्रात व्यवस्था.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 31, 2020

👌पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मजूर, कामगार, बेघर असे मिळून आलेल्या १११५ लोकांनाची पोलीसांनी केली निवारा केंद्रात व्यवस्था..


👌 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मजूर , कामगार , बेघर असे मिळून आलेल्या १११५ लोकांनाची पोलीसांनी केली निवारा केंद्रात व्यवस्था..

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यांच्या,जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत व पुणे शहरात संचारबंदी लागू केल्याने शहरातील सर्व कारखाने आस्थापना बंद झाले असल्याने त्याठिकाणी काम करणारे बाहेरील राज्यातील, जिल्ह्यातील मजूर, कामगार, तसेच वाहने बंद झाल्यामुळे अडकून पडलेले नागरीकांना सध्या निवारा व अन्न पाण्याचे साधन नसल्याने ते त्या गरजांकरीता रस्त्यावर निघताना दिसून येत असल्याने मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. डॉ . के . व्यंकटेशम यांनी दिलेल्या सुचनांवरुन मा.वाहतुक शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. डॉ . संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ चे श्री. शिरीष सरदेशपांडे , मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ चे श्रीमती. स्वप्ना गोरे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. रविंद्र रसाळ , मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चुडाप्पा , मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल पाटील यांनी पुणे शहरातील नाकाबंदी, पेट्रोलिंग करीता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना योग्य त्या सुचना देऊन पुणे शहरात रोडवर जे मजूर, कामगार, बेघर मिळून येत आहेत अशा एकुण १११५ लोकांना पोलीसांनी पुणे महानगरपालिका कडील ४ निवारा केंद्र व १५ महानगरपालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.

पुणे महापालिका उपायुक्त श्री. माधव जगताप यांच्या निरीक्षणाखाली निवारा केंद्राची व्यवस्था..
पुणे महानगरपालिका कडील ४ निवारा केंद्र व १५ महानगरपालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केलेले निवारा केंद्रांवर महापालिका उपायुक्त श्री.माधव जगताप यांच्या निरीक्षणाखाली क्षेत्रीय कार्यालय अधिकारी हे कामकाज करीत आहेत तसेच घनकचरा अभियंता, समाजविकास विभाग अधिकारी, समन्वयक असे वेगवेगळे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या निवारा केंद्रात दाखल केलेल्या नागरीकांना पुणे महानगरपालिकाच्या आरोग्य विभागाकडील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून निवारा केंद्रात दाखल केलेल्या नागरीकांना सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती मार्फत जेवणाची व्यवस्था होत आहे.

पुणे पोलीस दलाकडून नागरीकांनसाठी विशेष खबरदारी..
पुणे शहरातील नागरीकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता पुणे शहर पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत शहरात २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येत आहे त्यासाठी पुणे शहरात १३ ठिकाणी नाकाबदी पॉईट नेमण्यात आले असून नागरीकांना पीए सिस्टीमद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे.

मा.अपर पोलीस आयुक्त वाहतुक विभाग पुणे शहर श्री. डॉ . संजय शिंदे यांचे सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीनां आवाहन..
पुणे शहरात संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरणा-यांवर कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. शहरात कारखाने आस्थापना बंद झाले असल्याने त्याठिकाणी काम करणारे बाहेरील राज्यातील, जिल्ह्यातील मजूर, कामगार, बेघर नागरीक पुणे पोलिसांना मिळून येत आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात येत असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था सेवाभावनेने करण्याकरीता शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येवून मदत करण्याचे आवाहन मा.अपर पोलीस आयुक्त वाहतुक विभाग पुणे शहर श्री. डॉ . संजय शिंदे
यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages