👌 लॉकडाउनच्या काळात संवेदनशीलतेचे दर्शन घडवत पुणे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई श्री.राहूल गोसावी यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 27, 2020

👌 लॉकडाउनच्या काळात संवेदनशीलतेचे दर्शन घडवत पुणे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई श्री.राहूल गोसावी यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान..


👌 लॉकडाउनच्या काळात संवेदनशीलतेचे दर्शन घडवत पुणे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई श्री.राहूल गोसावी यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान..

पुण्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्यामुळे लोकांनी रक्तदान करावे,असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दि.२१ मार्च रोजी सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत पत्रकार परिषदत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि.२३ मार्च रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व जनतेला रक्तदानासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला संवेदनशीलतेचे दर्शन घडवत "रक्‍तदान हेच श्रेष्ठ दान' हे सामाजिक भान जपत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाच्या काळात लॉकडाउनमध्ये पुणे शहर सहकारनगर वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई श्री.राहूल गोसावी यांनी स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान केले आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे अनेक गोष्टींवर जसा परिणाम झाला आहे तसाच रक्त संकलन करण्यावरही खूपच परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे मोठी रक्तदान-शिबिरे घेण्यात अडचणी येत आहेत तसेच रक्तदाते घाबरून घरी बसत असल्याने रक्ताचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांत रोज होणारी ऑपरेशन्स आणि गंभीर आजारांसाठी रुग्णांना रक्त लागत आहे. या दृष्टीने विचार करून निरोगी रक्तदात्यांनी निश्चिंतपणे जनकल्याण रक्तपेढी, हॉटेल नटराजशेजारी, स्वारगेट बसस्थानका जवळ, पुणे येथे येऊन रक्तदान केल्याने आजारी रुग्णांना मदत तर होईलच आणि आपल्यालाही एका मोठ्या सामाजिक कार्यास हातभार लावल्याचे समाधान मिळेल. त्यामुळे सर्व रक्तदात्या मित्र-मैत्रिणीनी छोट्या गटात रक्तदान करण्यासाठी अवश्यक पुढे यावे. गटाने येताना जरा वेळ काढून या जेणे करून रक्तदात्यांचा वेळ वाचेल आणि रक्तपेढीत गर्दीही होणार नाही. जनकल्याण रक्तपेढीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षित पद्धतीने रक्तदान करण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेत रक्त संकलन केले जात असल्याने निरोगी रक्तदात्यांनी दररोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळात रक्तपेढीत येवून रक्तदान करावे, असे जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक श्री.डॉ.अतुल कुलकर्णी यांनी सर्व रक्तदात्यांना आवाहन केले आहे.

जनकल्याण रक्तपेढीची रक्तदात्याना महत्वाची खबरदारीची टिप :
ज्या रक्तदात्यांना थंडी, ताप, सर्दी, खोकला झालेला आहे व नुकताच परदेश प्रवास करून आलेल्या रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास येवू नये जेणे करून रक्त घेतांना थंडी, ताप, सर्दी, खोकला या सारखे साथीचे आजार बळावणार नाहीत.

Post Bottom Ad

#

Pages