🚨 पुण्यात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 20, 2020

🚨 पुण्यात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..


🚨 पुण्यात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद..

पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत एक संशयीत इसम अग्नीशस्त्र जवळ बाळगत असल्याची गुप्त माहिती कोंढवा गुन्हे प्रगटीकरण शाखेमधील पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव यांना मिळताच कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गल्ली न.३६,शिवनेरी नगर,कोंढवा याठिकाणी छापा टाकून १० हजार २०० रूपये किंमतीचे एक गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतूसे जप्त केल्याची घटना गुरुवार दि.१९ मार्च रोजी घडली आहे.

अनधिकृतपणे अग्नीशस्त्र बाळगणारा आरोपी विष्णु देवीदास कसबे (वय २३, रा.शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे) याला कोंढवा पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गु.र.न २४७/२०२० आर्म अॅक्ट ३/२५ मुंबई पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुरुवार दि.१९ रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रगटीकरण शाखेमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव याना त्यांच्या बातमीदाराकडून गल्ली न.३६,शिवनेरी नगर,कोंढवा येथे एका संशयीत इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती मिळताच लागलीच हि माहिती त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाडमा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार मा.पोलीस उप-निरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.ईकबाल शेख, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव, पोलीस नाईक श्री.पृथ्वीराज पांडुळे, पोलीस शिपाई श्री.अझीम शेख, पोलीस शिपाई श्री.उमाकांत स्वामी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवनेरी नगर,कोंढवा याठिकाणी सचिन कुदळे यांच्या पत्र्याच्या चाळीत छापा टाकून विष्णु देवीदास कसबे (वय २३, रा.शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे) या संशयीत इसमास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ १० हजार २०० रूपये किंमतीचे १ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतूसे हस्तगत करत जप्त करण्यात आली आहे. अनधिकृतपणे अग्नीशस्त्र बाळगल्याने विष्णु कसबे यास कायदेशिर कारवाईकामी कोंढवा पोलीस ठाणेमध्ये आणून त्याच्याविरुध्द गु.र.न २४७/२०२० आर्म अॅक्ट ३/२५ मुंबई पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

आरोपी विष्णु कसबे याने अग्नीशस्त्र कोठूण आणले व त्या अग्नीशस्त्राचे पुढे काय करणार होता ? याचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे मा. पोलीस उप-निरीक्षक श्री. संतोष शिंदे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फलारी यांच्या मार्गदर्शनानुसार मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या सुचनेप्रमाणे मा.पोलीस उप-निरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.ईकबाल शेख, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव, पोलीस नाईक श्री.पृथ्वीराज पांडुळे, पोलीस शिपाई श्री.अझीम शेख, पोलीस शिपाई श्री.उमाकांत स्वामी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages