🚨 पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले ०६ गावठी पिस्टल(अग्निशस्त्रे) व १२ काडतुसे युनिट ४ गुन्हे शाखेकडून जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 8, 2020

🚨 पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले ०६ गावठी पिस्टल(अग्निशस्त्रे) व १२ काडतुसे युनिट ४ गुन्हे शाखेकडून जप्त..

🚨 पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले ०६ गावठी पिस्टल(अग्निशस्त्रे) व १२ काडतुसे युनिट ४ गुन्हे शाखेकडून जप्त..

मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.के व्यंकटेशम व मा.पोलीस सहआयुक्त श्री.रविंद्र शिसवे यांनी पुणे शहरात कायदा सुव्यवस्था राहण्याच्या अनुषंगाने आदेशीत केल्यानुसार गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस तपासी कारवाई करत असतांना मीळालेल्या प्राप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पुणे शहरात जबरी चोरी, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे, अग्निशस्त्राची विक्री करणे, खूनाचा प्रयत्न असे एकूण २५ गुन्हे दाखल असलेल्या ०२ सराईत गुन्हेगारांना अटक करून आरोपीकडून ०६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त केली आहे.

गावठी पिस्टल(अग्निशस्त्र)ची विक्री करणारे सराईत आरोपी
१) रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय ३३, रा. श्रेयश अपार्टमेंट,२०७,सोमवार पेठ, दारुवाला पुल,पुणे),
२) चंद्रशेखर रामदास वाघेल (वय ३०, रा. मुंकुदनगर,पुणे) यांना युनिट ४ गुन्हे शाखेने ताब्यात घेत ०६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त करत आरोपीवर समर्थ पोलीस स्टेशन गुरनं ६९/२०२० आर्म अॅक्ट क ३(२५) मपोआ का क ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर मा. पोलीस आयुक्त श्री. के व्यंकटेशम मा. पोलीस सहआयुक्त श्री. रविंद्र शिसवे यांनी गुन्हेगारांचे विशेषतः अग्निशस्त्रे व कोयता बाळगणारे गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांचे हालचालीवर देखरेख ठेवण्याचे आदेशनुसार मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हेशाखा श्री. अशोक मोराळे मा. पोलीस उपआयुक्त गुन्हेशाखा श्री. बच्चनसिंह यांनी गुन्हे शाखेच्या सर्व युनिट यांना त्याबाबत सूचना दिल्यानुसार गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस कर्तव्य करत असतांना गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस हवालदार श्री. सुनिल पवार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हे कार्यप्रणालीच्या अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार समर्थ व्यायाम शाळेजवळ,रास्ता पेठ,पुणे येथे येणार आहेत व त्यांचेकडे गावठी पिस्टल (अग्निशस्त्रे) आहेत. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.विजय झंजाड , पोलीस कर्मचारी श्री.सुनिल पवार, श्री.सचिन ढवळे, श्री.अतुल मेंगे, श्री.विशाल शिर्के, श्री.दत्ता फुलसुंदर यांच्या पथकाने सापळा लावून १) रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय ३३, रा. श्रेयश अपार्टमेंट,२०७,सोमवार पेठ, दारुवाला पुल,पुणे), २) चंद्रशेखर रामदास वाघेल (वय ३०, रा. मुंकुदनगर,पुणे) असे दोन रेकॉर्डवरील आरोपी हे गावठी पिस्टल व काडतुसांसह मिळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता आरोपीकडून ०६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त करत आरोपीवर समर्थ पोलीस स्टेशन गुरनं ६९/२०२० आर्म अॅक्ट क ३(२५) मपोआ का क ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीमध्ये अधिक पिस्टल मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रेकॉर्डवरील आरोपी रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण याचेवर सन २०१६ रोजी सेंधवा,मध्यप्रदेश येथे गावठी पिस्टल खरेदी करायला गेला असता त्यास तेथील व्यापारी व ०८ पिस्टलसह पकडण्यात आले होते. त्यावेळी तो सेंधवा येथे अटक होता. त्यावेळी सेंधवा येथील अग्निशस्त्र विकत घेणारा अशी त्याची ओळख झाली होती. त्या केसच्या सुनावणीसाठी तो मागिल ०६ महिन्यात दर दोन महिन्यांनी सेंधवा न्यायालयात जात होता. नोव्हेंबर २०१९ च्या पहिल्या आठवडयात त्याचा सहकारी मित्र चंद्रशेखर वाघेल याचेसह तारखेला गेला असता, ०४ पिस्टल आणले होते व जानेवारीमध्ये पुन्हा ०२ पिस्टल आणले होते. आरोपी रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण याने पिस्टल पैकी ०५ पिस्टल स्वतःजवळ व ०१ पिस्टल चंद्रशेखर याने स्वतःजवळ ठेवले होते. आरोपी रोहन ऊर्फ दुध्या हा यापुर्वी समर्थ पोलीस स्टेशन येथे अग्निशस्त्राच्या गुन्हयात अटक होता. आरोपी रोहन ऊर्फ दुध्या चव्हाण याच्याविरुध्द पुणे शहरात जबरी चोरी, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे,विक्री करणे असे एकूण २३ गुन्हे व सेंधवा,मध्यप्रदेश येथे ०१ गुन्हा असे मिळून २४ गुन्हे दाखल आहेत. चंद्रशेखर वाघेल याच्याविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे खूनाचा प्रयत्न केल्याबददल ०१ गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी,
मा. अपर पोलीस आयुक्त श्री. अशोक मोराळे , मा. पोलीस उपआयुक्त श्री. बच्चन सिंह , सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. श्री. शिवाजी पवार , श्री. विजय चौधरी , पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय झंजाड , पोलीस कर्मचारी श्री. सुनिल पवार , श्री. सचिन ढवळे , श्री. अतुल मेंगे , श्री. निलेश शिवतरे , श्री. विशाल शिर्के , श्री. राकेश खुणवे , श्री. दत्तात्रय फुलसुंदर , श्री. गणेश साळुखे , श्री. भालचंद्र बोरकर , श्री. सुहास कदम , श्री. राजू मचे , श्री. अशोक शेलार , श्री. शंकर पाटील , श्री. शितल शिंदे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages