🚨 पुण्यात टेम्पो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस ३०२ सारखा गंभीर गुन्ह्यात अटक करत ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 3, 2020

🚨 पुण्यात टेम्पो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस ३०२ सारखा गंभीर गुन्ह्यात अटक करत ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त..


🚨 पुण्यात टेम्पो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस ३०२ सारखा गंभीर गुन्ह्यात अटक करत ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त..

पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना कोंढवा पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे शहरात अँपे चाकी टेम्पो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन सखोल चौकशी केली असता आरोपींनकडून चोरीच्या ५ अँपे रिक्षा व एका रिक्षाचे ईजिन असे एकुन ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत भादवी कलम ३०२ सारखा गंभीर गुन्हा उघड केला आहे.

आरोपी वसीम अजमल खान, बाबा उर्फ रमजान हसन शेख,अन्सार आयुब खान यांना कोंढवा पोलीसांनी चोरी व खुनाच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे.

असा प्रकारे कोंढवा पोलीसांनी आरोपींनकडून खून व चोरीचा गुन्हा केला उघड..
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१८ मध्ये चार टेम्पो रिक्षा चोरीच्या दाखल गुन्ह्यात तपास करत असतांना टेम्पो कोणी चोरी केले या बाबतची माहिती कोंढवा तपास पथकातील पोलीस शिपाई ज्योतिबा पवार, व पोलीस नाईक अमित साळुंखे ,यांना त्याचे गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाल्यानंतर वरील स्टाफ पोलीस शिपाई ज्योतिबा पवार,पोलीस नाईक अमित साळुंखे,सहायक पोलीस हवलदार संतोष नाईक,पोलीस नाईक सजीव कळंबे,पोलीस नाईक निलेश वणवे, पोलीस शिपाई किशोर वळे, पोलीस शिपाई उमेश शेलार यानी कोंढवा येथे सापळा रचून आरोपी वसीम अजमल खान (रा.शिवनेरी नगर ,कोंढवा खुर्द,पुणे) यास ताब्यात घेत कोंढवा पोलीस ठाण्यात आणत सखोल चौकशी केली असता आरोपी वसीम याने त्याचे साथीदार १) बाबा उर्फ रमजान हसन शेख २) अन्सार आयुब खान ३) पाहीजे असलेला आरोपी तौसिफ रफिक शेख याच्यासह सन २०१८ मध्ये तीन अँपे चाकी टेम्पो रिक्षा चोरी केल्याची कबूली दिल्याने दि.२५ फेब्रुवारी रोजी कोंढवा पो.ठाणे.गु.र.क्र.२७०/१८भादवी ३७९ मध्ये अटक केली. आरोपी वसीम अजमल खान याने कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २७०/१८ या गुन्ह्यातील ज्या ठिकाणाहून रिक्षा चोरी केली ते ठिकाण तसेच पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्यास २ गुन्हे (गु.र.क्र.३८६/१८ व ४९१/ १८ ),भारती विद्यापीठ १ गुन्हा(गु.र.क्र.५१५/१८) व समथेँ पोलीस ठाण्याचा १ गुन्हा (गु.र.क्र.२५०/१८) दाखल गुन्ह्यातील रिक्षा चोरी केल्याचे उघड करत आरोपी वसीम अजमल खान याने चोरीचा मुद्देमाल जळगाव नशिराबाद,फैजपूर येथे ठेवल्याची माहिती मिळताच त्याला सोबत घेऊन फैजपूर येथे जाऊन त्याने केलेल्या चोरीच्या ५ अँपे रिक्षा व एका रिक्षाचे ईजिन जप्त करत असे एकुन ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी वसीम अजमल खान याने सन २०१७ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्यास अकस्मात मयत रजि. १३४/१७ cr pc.१७४ प्रमाणे दाखल गुन्ह्यात पारसी ग्राउंड ,कोंढवा येथे एक अनोळखी इसमाचा आरोपीने साथीदार १) इमरान शेख अहमद खान, २) अहमद अयुब खान ३) शाहरूख उफेँ खड्डा हसन खान यांच्यासह खून केल्याची कबूली दिल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग ६७/१७ प्रमाणे दाखल महाविदयालयीन तरुणाचा खून केल्याची कबूली दिल्याने भादवी कलम ३०२ सारखा गंभीर गुन्हा उघड केला.

कोंढवा पोलीसांनी आरोपींनकडून पुणे शहरातील पोलीस ठाणेमधील दाखल गुन्हे उघड..
१) कोंढवा पोलीस ठाणे :- गु.र.क्र.२७०/१८भादवी ३७९                                      
२) कोंढवा पो.ठाणे :- गु.र.क्र.३८६/१८ भादवी ३७९
३) कोंढवा पो.ठाणे :- गु.र.क्र.४९१/१८भादवी.३७९
४) भारती विद्यापीठ पो.ठाणे :- गु.र.क्र.५१५/१८भादवी३७९
५) समर्थ पो.ठाणे :- गु.र.क्र.२५०/१८भादवी कलम ३७९
६) कोंढवा पो.ठाणे :- गु.र.क्र.१९३/२०२० भादवी ३०२,२०१,३४ हा गुन्हा उघड केला आहे.

सदरची कामगीरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पु.प्रा.वि.पुणे श्री. सुनिल फुलारी , मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 श्री. सुहास बावचे , मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री. सुनील कलगुटकर , कोंढवा पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , कोंढवा पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री. महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मोरे , पोलीस हवलदार संतोष नाईक , पोलीस नाईक निलेश वणवे , पोलीस नाईक अमित साळुंखे , पोलीस नाईक संजीव कळंबे , पोलीस शिपाई जोतिबा पवार , पोलीस शिपाई उमेश शेलार , पोलीस शिपाई आदर्श चव्हाण , पोलीस शिपाई किशोर वळे यांनी केली आहे . 🔫 दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल अखेर CBI ला सापडले..

Post Bottom Ad

#

Pages