🌫 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांच्या प्रयत्नातून उंड्री गाव परिसरात औषधाची फवारणी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, March 25, 2020

🌫 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांच्या प्रयत्नातून उंड्री गाव परिसरात औषधाची फवारणी..


🌫 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांच्या प्रयत्नातून उंड्री गाव परिसरात औषधाची फवारणी..

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उंड्री गाव परिसरातील लोकवस्ती, उंड्री पोलीस स्टेशन आणि सोसायटीमध्ये औषध फवारणी करण्यात यावी अशा सूचना समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे, पैलवान श्री.शशिकांत पुणेकर, श्री.कैलास पुणेकर, उंड्री ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश पुणेकर, श्री.दादासाहेब कड यांनी सामाजिक बांधिलकी जपत महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने उंड्री या परिसरात सोडियम हायपोक्लोराइड औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाव्हायरस च्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.

सर्व जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने आता देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या विषाणूचा सर्वाधिक मोठा फटका पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला बसला असून राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

याच धर्तीवर सामाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या कर्तव्य भावनेतून समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांनीही आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा काळजीच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. परिसरात स्वच्छता राहावी व रोगराई पसरू नये यासाठी या परिसरातील गावठाण, पुणेकर मळा, भिंताडे नगर, कामठे नगर, कडं नगर, ब्लिस सोसायटी, भूमी  स्प्रिंगटाऊन सोसायटी, क्रोम सोसायटी, गंगा स्‍पर्श सोसायटी, गंगा ईलिका सोसायटी, लश लाइफ सोसायटी, ग्लिस्ट सोसायटी, रोज वूड सोसायटी, प्रेस्टिज कॉम्प्लेक्स सोसायटी, वॉटर रिच सोसायटी, ट्यूलिप व्हिला सोसायटी, हील्स हांड डिल्स सोसायटी, गगन अँव्हेन्यू, नियाती व्हीन चाँग सोसायटीत, उंड्री गावठाणातील मंदिरे, उंड्री पोलीस चौकी येथे औषध फवारणी करण्यात येत असून समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांनी स्वतः जातीने लक्ष घालत उपस्थित राहून औषध योग्यरीत्या फवारणी होत आहे का याची पाहणी केली.

यासंदर्भात बोलताना समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे म्हणाले की, कोरोना नावाचा हा विषाणू ऐक अर्थी संपूर्ण जगावर कोसळलेले संकट आहे. दुर्दैवाने भारतातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहरावर या आजाराचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मात्र या आजारा विरोधात जनजागृती केल्यास आणि खबरदारी घेतल्यास या विषाणूचा सामना करणे सोपे आहे. महापालिका प्रशासन यंत्रणा काम करीत असताना आपणही समाजसेवक म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी साठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आदेशाचे पालन करावे तसेच खबरदारी बाळगून रोगराईला दूर करावे असे आव्हान समाजसेवक श्री.राजेंद्रशेठ भिंताडे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages