👌खाकी वर्दीतील माणूसकी; पैसा अभावी भुकेने व्याकुळ झालेल्या परदेशी विद्यार्थ्यास कोंढवा पोलीसांनी पोटभर जेवण देऊन किराणा मालाची केली मदत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 29, 2020

👌खाकी वर्दीतील माणूसकी; पैसा अभावी भुकेने व्याकुळ झालेल्या परदेशी विद्यार्थ्यास कोंढवा पोलीसांनी पोटभर जेवण देऊन किराणा मालाची केली मदत..


👌 खाकी वर्दीतील माणूसकी; पैसा अभावी भुकेने व्याकुळ झालेल्या परदेशी विद्यार्थ्यास कोंढवा पोलीसांनी पोटभर जेवण देऊन किराणा मालाची केली मदत..
ड्यूटीसाठी कठोर बनलेला वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो. अशाच खाकी वर्दीत दडलेल्या अधिकाऱ्यांनी व्हीव्हीआईटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्याची पैसा अभावी भुकेने व्याकुळ झालेल्याला पोटभरून जेवण देऊन आठ ते दहा दिवस पुरेल इतके किराणा माला देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

कोंढवा परिसरात भाडे तत्वावर राहणारा व्हीव्हीआईटी महाविद्यालयात शिक्षण घेणारा MOCAMBIQUE या देशाचा परदेशी विद्यार्थी हा करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लाॅकडाऊनच्या काळात पैसाचा अभावमुळे भुकेने व्याकुळ झाला होता.

देशातील सर्वच घटकांना करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व लाॅकडाऊनच्या काळात फटका बसू लागला आहे. सर्वाधिक दयनीय अवस्था परदेशातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची झाली आहे. व्हीव्हीआईटी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या परदेशी विद्यार्थ्याची पैसा अभावी अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याने त्याच्याकडे कोणताही मार्ग नसल्याने त्याने थेट शुक्रवारी दि.२७ मार्च रोजी रात्री १०.०० वाजता कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे यांची भेट घेत जेवण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत हे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे यांनी तात्काळ परदेशी विद्यार्थ्यास स्विगी या ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून जेवण मागवून पोटभरून जेवण देत आठ ते दहा दिवस पुरेल इतके किराणा माला दिला.
तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे व्हीव्हीआईटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्याने कोंढवा पोलिसांचे आभार मानले.

Post Bottom Ad

#

Pages