⛽ पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकारी नवल किशोर राम.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 24, 2020

⛽ पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकारी नवल किशोर राम..


पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकारी नवल किशोर राम..
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉक डाऊन जाहीर केलं आहे. सर्व सरकारी वाहतूक व्यवस्था बंद केल्या असूनही लोकं आता खजगी वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी इंधन विक्रीवर बंधने आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी राम यांनी जिल्हा पेट्रोल डिझेल पंप असोसिएशनला पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे. यात त्यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ च्या खंड २,३,४,चा दाखला देत पंप चालकांना आदेश दिला आहे. वगळण्यात आलेल्या वाहनांना सोडून इतर कोणालाही इंधन विक्री करू नये असं आदेश आहे.

आदेशा मधून यांना वगळण्यात आले 
१) अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी.
२) कोरोना नियंत्रण आणि निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.
३) अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खजगी व्यक्ती.
४) वैद्यकीय उपचार कीवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.
अशा वगळण्यात आलेल्या व्यक्तींनी एकाच वेळी टाकी संपूर्ण भरून घ्यावी अशीही सूचना करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्ह्यातील वरील  १ ते ४ व्यक्तींची यादी बनवून ती पेट्रोल डिझेल पंप व्यावसायिकांना द्यावी असे आदेश दिले आहेत.


Post Bottom Ad

#

Pages