🚨 लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ‘एप्रिल फूल’चे अफवा पसरवण्याचे मेसेज पाठवाल तर होणार कडक कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 31, 2020

🚨 लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ‘एप्रिल फूल’चे अफवा पसरवण्याचे मेसेज पाठवाल तर होणार कडक कारवाई..


🚨 लोकांना मूर्ख बनवण्यासाठीएप्रिल फूलचे अफवा पसरवण्याचे मेसेज पाठवाल तर होणार कडक कारवाई..

आज ३१ मार्च आणि उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’चा दिवस या दिवशी सर्व लोक आपल्या मित्रमंडळींना विविध ‘एप्रिल फूल’चे मेसेज पाठवून मजा मस्करी करीत असतात. पण सध्या महाराष्ट्र आणि देशात करोनाचे संकट आहे. त्यामुळे चुकीचे मेसेज आणि अफवा पसरवल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

देशमुख म्हणाले, आज ३१ मार्च आणि उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’चा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे की, आज संपूर्ण देश, महाराष्ट्र करोनशी झुंजत आहे. त्यामुळे अशा वेळी वातावरण बिघडेल असे चुकीचे मेसेज किंवा अफावा पसरवू नका. अशा प्रकारे जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा वातावरण खऱाब करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सायबर क्राईमच्या अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी सरकाला सहकार्य करावं.

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणत्याही माहितीची शहानिशा न करता लोक ती सर्रास फॉरवर्ड करत असतात. मात्र, त्यामुळे सर्वत्र अफवांचे पिक येते आणि परिस्थिती बिघडू शकते. १ एप्रिल हा दिवस जगभरात लोकांना मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळे अनेक जण सहजच आपल्या मित्र-मंडळींना मूर्ख बनवण्यासाठी खोटे मेसेज पाठवतात. मात्र, सध्याच्या बिकट परिस्थितीत असे मेसेज वेगाने पसरुन त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पोलिसांनी अशा अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला आणि अफवा पसरवणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

Post Bottom Ad

#

Pages