🚨 मुंबईहून कारने पुण्यात चोऱ्या करणाऱ्या आरोपींनकडून ११ गुन्हे उघडकीस; ६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 5, 2020

🚨 मुंबईहून कारने पुण्यात चोऱ्या करणाऱ्या आरोपींनकडून ११ गुन्हे उघडकीस; ६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त..

🚨 मुंबईहून कारने पुण्यात चोऱ्या करणाऱ्या आरोपींनकडून ११ गुन्हे उघडकीस; ६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त..

पुण्यात एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना स्वारगेट पोलिसांनी आरोपींना पकडत सखोल चौकशी केली असता आरोपी हे मुंबईहून कारने पुण्यात येऊन लॉजवर राहत दिवसा पीएमपी बसमधून प्रवासकरून शहरात चोऱ्या करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. स्वारगेट पोलिसांनी आरोपींनकडून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणत एकूण ६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१) किरण सुभाष मिस्त्री (वय २४, रा. दत्तनगर, ट्रॉम्बे रस्ता),
२) सुर्यकांत सन्नप्पा गंगेरू (वय २५, रा. घाटकोपर, पश्चिम),
३) इशरद अब्दुल रहीम बेग (वय २८, रा. मानखुर्द, मुंबई),
४) नजीब मुजीद मोमीन (वय २०, रा. पाचपीर चौक, काळेवाडी ),
५) मोहंमद शब्बीर दस्तगीर शेख (वय २३),
६) रहीमतउल्ला समीरउल्ला शेख (वय २६, रा. दोघेही- रा. चित्ता कॅम्प ट्रॉम्बे, मुंबई) अशी अटक केलेल्याची आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या २ साथीदारांचा स्वारगेट पोलिस शोध घेत आहेत.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे-सातारा रस्त्यावरील कालव्याजवळील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना स्वारगेट पोलिसांनी आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी हे पीएमपी बसमध्ये चोऱ्या करण्यासाठी मुंबईहून खास पुण्यात आल्याचे समोर आले. तसेच, आरोपी हे पुण्यातील कॅम्प परिसरामधील एका लॉजमध्ये राहून काही दिवस शहरात चोऱ्या करून ऐवज जमा झाल्यानंतर पुन्हा आरोपी त्यांच्या कारमधून मुंबईला जात होते. स्वारगेट पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे ११ मोबाईल जप्त केले त्यापैकी ९ मोबाईल स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तर बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ मोबाईल असे एकूण ६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages