🚨 पुण्यात घरफोडी करणारे २ सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलीसांनी केली अटक; ०४ गुन्हे उघडकीस आणत ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 6, 2020

🚨 पुण्यात घरफोडी करणारे २ सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलीसांनी केली अटक; ०४ गुन्हे उघडकीस आणत ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..


🚨 पुण्यात घरफोडी करणारेसराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलीसांनी केली अटक; ०४ गुन्हे उघडकीस आणत ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

पुणे शहरात घरफोडीचे सत्र सूरूच असतांना कोंढवा तपास पथकातील पोलीसांनी कोंढवा पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना मिळालेल्या प्राप्त माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्यातील २ सराईत आरोपीना अटक करत सखोल चौकशी केली असता आरोपींनी पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाणे ०३ व येरवडा पोलीस ठाणे ०१ असे एकुण ०४ दाखल घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडुन ९,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे शहरात घरफोडी करणारे सराईत आरोपी
१) नाजिम ईस्लाम अन्सारी (वय ३५, रा.कामराज नगर,येरवडा,पुणे. मुळ रा.हारगांव चांदन पोस्ट,तालुका नागीन,जिल्हा बिजनोर,राज्य उत्तर प्रदेश),
२) मासुम अन्सारी (रा.अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी मुळ रा.दिल्ली) यांना कोंढवा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे अाहेत.

पुणे शहरातील दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलीसांचा तपास..
पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्याचा कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या सुचने प्रमाणे कोंढवा तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे व कर्मचारी तपास करत असतांना मिळालेल्या प्राप्त माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी नाजिम ईस्लाम अन्सारी (वय ३५, रा.कामराज नगर,येरवडा,पुणे. मुळ रा.हारगांव चांदन पोस्ट,तालुका नागीन,जिल्हा बिजनोर,राज्य उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता कोंढवा पोलीस ठाणे अभिलेखावरील रजिस्टर क्रमांक १९६/२०२० भादवि कलम ४५४,३८०,३४ प्रमाणे दाखल घरफोडीचा गुन्हा आरोपीने साथीदारासह केल्याची कबूली दिली. आरोपींकडुन दाखल गुन्हयांत चोरीस गेलेले रोख रुपये व ऐवजापैकी २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये ७५,०००/- असे एकुण रक्कम रुपये ७.१९,०००/- मुद्देमाल जप्त करत कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. तसेच दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या साथीदार आरोपी मासुम अन्सारी (रा.अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी मुळ रा.दिल्ली) याचा तपास पथकातील पोलीसांनी शोध घेऊन ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपीने येरवडा पोलीस ठाणे पुणे शहरच्या हद्दीमध्ये जयजवान नगर येथे चोरी केल्याची कबुल दिली व त्याचेकडुन दाखल गुन्हयातील ०९ तोळे वजनाचे १,८०,०००/- रुपये किंमतीचे दागिने जप्त करत अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी नाजिम ईस्लाम अन्सारी व मासुम अन्सारी या दोघांनी मिळून कोंढवा पोलीस ठाणे ०३ व येरवडा पोलीस ठाणे ०१ असे एकुण ०४ दाखल घरफोडीचे गुन्हे कोंढवा तपास पथकातील पोलीसांनी उघडकीस आणत आरोपीकडुन ९,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी पोलीस ठाणे येथील दाखल घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले..
१) कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२० भादवि कलम ४५४.३८०,३४
२) कोंढवा पोलीस ठाणे गुरन ८१९/१९ भादवि कलम ४५४,४५७,३८०
३) कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.१४४/२०२० भादवि कलम ४५४,४५७.३८०
४) येरवडा पोलीस ठाणे पुणे.

सदर कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फलारी यांच्या सुचनांप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक बर्गे, पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.ईकबाल शेख, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवालदार श्री.योगेश कुंभार, पोलीस नाईक श्री.पृथ्वीराज पांडुळे, पोलीस नाईक श्री.कौस्तुभ जाधव, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.उमाकांत स्वामी, पोलीस शिपाई श्री.अजीम शेख, पोलीस शिपाई श्री.मोहन मिसाळ, पोलीस शिपाई श्री.अमित बधे, पोलीस शिपाई श्री.रोहीत कर्णे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages