🚨 पुण्यात अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद; ५.९१० ग्रँम वजन दहा हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ (MD) जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 19, 2020

🚨 पुण्यात अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद; ५.९१० ग्रँम वजन दहा हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ (MD) जप्त..


🚨 पुण्यात अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगणाऱ्या इसमास कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद; ५.९१० ग्रँम वजन दहा हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ (MD) जप्त..

पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध्य धंदे प्रतिबंधक करण्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना पारगे नगर, कोंढवा, पुणे येथे एक इसम संशयित इसम १०,०००/- रूपये किंमतीचा ५.९१० ग्रँम वजनाचे अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगत फिरत असतांना मिळून आल्याची घटना मंगळवार दि.१८ मार्च २०२० रोजी घडली आहे.

अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगणारा संशयित इसम सलमान नासीर शेख (वय २४, रा.सवेरा पाकेँ,कोंढवा पुणे) यास अटक करत त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये N.D.P.S Act ८,(क),२२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवार दि.१८ मार्च २०२० रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे व कोंढवा तपास पथकातील पोलीस हवलदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.निलेश वणवे, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस शिपाई श्री.जोतिबा पवार, पोलीस शिपाई श्री.उमेश शेलार, पोलीस शिपाई श्री.किशोर वळे, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांच्यासह अवैध्य धंद्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असतांना पारगे नगर, कोंढवा, पुणे येथे सलमान नासीर शेख (वय २४, रा.सवेरा पार्क,कोंढवा पुणे) नावाचा एक इसम संशयितरित्या फिरत असतांना त्यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता. त्याच्याजवळ १०,०००/- रूपये किंमतीचा ५.९१० ग्रँम वजनाचे अंमली पदार्थ (MD) मिळून आला. संशयित इसम सलमान शेख यास कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्यावर अंमली पदार्थ (MD) जवळ बाळगल्या प्रकरणी N.D.P.S Act ८, (क),२२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदर संशयित इसम याने अंमली पदार्थ (MD) कोठून आणला तो कोणाला याची विक्री करणार होता. याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी,
मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे,
मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर,
कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड,
कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस हवलदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.निलेश वणवे, पोलीस नाईक श्री.अमित साळुंखे, पोलीस नाईक श्री.सुशील धिवार, पोलीस शिपाई श्री.जोतिबा पवार, पोलीस शिपाई श्री.उमेश शेलार, पोलीस शिपाई श्री.किशोर वळे, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages