📱पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या What’s App वर व्हायरल मेसेज अफवा असल्याचे उघड.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, March 20, 2020

📱पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या What’s App वर व्हायरल मेसेज अफवा असल्याचे उघड..


📱 पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या What’s App वर व्हायरल मेसेज अफवा असल्याचे उघड..

What’s App वर सध्या करोना विषाणू संबंधी चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारी प्रशासनाने What’s App वर असे चुकीचे मेसेज किंवा अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु, यावर आळा बसत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. आज शुक्रवार रात्री दहा वाजल्यापासून उद्या सकाळी पाच वाजे पर्यंत घर सोडू नका. कोविड-१९ kill मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होणार असल्याने आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना माहिती द्या असा मेसेज सध्या पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. दरम्यान ही अफवा असल्याचे समोर आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात जास्त करोना बाधित रुग्ण असून करोना संबंधी चुकीचा मेसेज What’s App वर व्हायरल केला जात आहे. हा मेसेज पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असा मेसेज महानगर पालिकेकडून पाठविण्यात आला नसल्याचे पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ.रॉय यांनी माहिती दिली आहे. ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मेसेजवर विश्वास ठेवून पुढे पाठवू नका. दरम्यान, नागरिकांनी असा मेसेजची शहानिशा करूनच पुढे व्हायरल करायला हवं. मात्र, तस होताना दिसत नाही. परंतु, ज्याने कोणी असा खोडसाळ पणा केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

नेमका व्हायरल होत असलेला चुकीचा /फेक मेसेज काय आहे ?..

मनपा आयुक्तांचा संदेश

“नमस्कार, मी तुम्हाला विनंती करतो की आज रात्री 10 वाजल्या नंतर व उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत आपले घर सोडू नका. कोविड-१९ kill मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होणार असल्याने !! आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटूंबाला ही माहिती सामायिक करा …

धन्यवाद ! “

Post Bottom Ad

#

Pages