🤝 "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि प्रकाश कोल्हापुरी मसाले" यांच्या सहकार्यातून 100 किलो मसाल्याचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, April 19, 2020

🤝 "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि प्रकाश कोल्हापुरी मसाले" यांच्या सहकार्यातून 100 किलो मसाल्याचे वाटप..


🤝 "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि प्रकाश कोल्हापुरी मसाले" यांच्या सहकार्यातून 100 किलो मसाल्याचे वाटप..

पुणे शहरातील एकही व्यक्ती लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना कटिबद्ध असल्याने दररोज जेवणाचे पाकिटे समाज सेवकांनकडून घेत गरजवंतांना वाटप करणाऱ्या "सिंहगड रस्ता पत्रकार व सिंहगड रोड फुड डोनेशन एक हात मदतीचा" पत्रकार मित्रांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष श्री.नितीन बिबवे आणि प्रकाश कोल्हापुरे मसाले कंपनीचे मालक श्री.पवण जाधव व त्यांचे वडिल श्री.बाबासाहेब जाधव यांच्या सहकार्यातून 100 किलो (मिरची पावडर, गोडा मसाला, धणे पावडर, कांदा-लसूण) मसाल्याचे वाटप करण्यात आले ("सिंहगड रस्ता पत्रकार व सिंहगड रोड फुड डोनेशन एक हात मदतीचा" पत्रकार ज्या समाजसेवाकाकडून जेवणाचे पाकिटे आणत आहेत त्यांना या मसाल्यांचे वाटप करणार आहेत).

यावेळी, प्रकाश कोल्हापुरी मसाल्याचे मालक श्री.बाळासाहेब जाधव (वडिल), श्री.पवण जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष श्री.नितीन बिबवे, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री.अजित घस्ते, पुणे शहर खजिनदार श्री.पंकज बिबवे, पुणे शहर संघटक सचिव श्री.भूषण गरुड, पत्रकार (सकाळ) श्री.विशाल तांबे, (संपादक -विजन महाराष्ट्र) श्री.प्रकाश यादव, समाजसेवक श्री.भरत सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages