🚨 अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली चालू असलेला गोरखधंदा नाकाबंदीतील भारती विद्यापीठ पोलिसांनी केला उघड; 12 बिअरचे बॉक्स केले जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 15, 2020

🚨 अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली चालू असलेला गोरखधंदा नाकाबंदीतील भारती विद्यापीठ पोलिसांनी केला उघड; 12 बिअरचे बॉक्स केले जप्त..


🚨 अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली चालू असलेला गोरखधंदा नाकाबंदीतील भारती विद्यापीठ पोलिसांनी केला उघड; 12 बिअरचे बॉक्स केले जप्त..

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे शहरात अती महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीत अत्यावश्यक सेवेचा पुरवठा सुरळीत राहणेकामी नाकाबंदीमधून अत्यावश्यक सेवेला वगळन्यात आल्याने काही समाजकंठक दुधाच्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नाकाबंदीत अवैध्य दारूची वाहतूक करणार्याचा गोरखधंदा नाकाबंदीतील भारती विद्यापीठ पोलीसांनी उघडकीस आणला आहे. दुधाच्या टेम्पोमधून बियरचे 12 बॉक्स जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.

नाकाबंदीत दुधाच्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अवैध्य दारूची वाहतूक करणारा सलीम बशीर शेख (वय 24, रा.भिलारेवाडी, ता.हवेली, जि.पुणे) व सिध्दार्थ संजय मिसाळ (वय 22, रा. भिलारेवाडी, ता.हवेली, जि.पुणे) असे भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अत्यावश्यक सेवेच्या आडून अवैध्य दारूच्या वाहतूकीचा भारती विद्यापीठ पोलीसांनी असा केला पर्दाफाश..
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात नाकाबंदी करण्यात आली असताना सोमवार दि.13 एप्रिल 2020 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास कात्रज-जुना बोगदा, कात्रज, पुणे येथे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असलेले भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे नाकाबंदीचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मधुरा कोराणे, पोलीस कर्मचारी व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस हवलदार श्री.पारखी, पोलीस हवालदार श्री.तोंडे, पोलीस नाईक भिंगारे, पोलीस शिपाई श्री.झुंजार नाकाबंदीचे कर्तव्यावर असताना अत्यावश्यक सेवेतील दुधाचा टेम्पो क्रमांक MH.12.JF.6988 तेथून जात असतांना दुधाच्या टेम्पोला थांबून चेक केला असता. दुधाचा टेम्पो चालकाच्या बोलण्यावर संशय वाटल्याने टेम्पो व्यवस्थित चेक केला असता दुधाच्या क्रेटच्या पाठीमागे लपवलेले बियरचे 12 बॉक्स मिळून आले.
अवैध्य वाहतूक करणारे आरोपी सलीम बशीर शेख (वय 24, रा.भिलारेवाडी, ता.हवेली, जि.पुणे) व सिध्दार्थ संजय मिसाळ (वय 22, रा. भिलारेवाडी, ता.हवेली, जि.पुणे) यांनी स्वतःचे फायदयाकरीता अवैध्यपणे, अनाधिकाराने बिअर विक्री अथवा बाळगणेविषयी कोणताही परवाना नसताना प्रोव्हिबिशन मालाची वाहतुक करीत असताना 19 हजार 470/- रूपये किमतीचा किंगफिशर कंपनीच्या एकून 118 बिअरच्या बॉटल प्रत्येकी बॉटल 165 /- रू. किमंत व 1 लाख 50 हजार रूपये किमतीचा एक अशोक लेलॅन्ड दोस्त कंपनीचा टेम्पो क्र.MH.12.JF.6988, असे एकूण 1 लाख 69 हजार 470/- रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करत. भारती विदयापीठ पोलीस ठाण्याचे नाकाबंदीचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मधुरा कोराणे यांनी आरोपी सलीम शेख, सिध्दार्थ मिसाळ यांना मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाणेमध्ये गू.र.न.483/2020,महाराष्ट्र प्रोव्हिविशन कायदा कलम 65 (अ)(ई) अन्वेय प्रमाणे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.वसंत कुंवर, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस फौजदार श्री.देशमुख करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages